नागपूर : जगात दरवर्षी सर्वाधिक 17 लाख लोकांचा मृत्यू भारतात होतो. सध्याच्या मूल्यांकनानुसार सर्वाधिक 7 टक्के मृत्यू ग्रामीण भागात होतात आणि सर्वाधिक 12 टक्के मृत्यू शहरी भागात होतात. यात हृदयविकाराचा वाटा मोठा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी सक्षम व जागरूक होणे गरजेचे आहे. पूर्वी वयाच्या 50 शीनंतर दस्तक देणारा हृदयविकार आता ऐन तारुण्यात गाठत आहे. 100 रुग्णांपैकी 30 रुग्ण हे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. देशात दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराचा झटका येतो. विशेष म्हणजे यात अन्य आजारांसोबत हृदयविकार होण्यापेक्षा अचानक हृदयक्रिया बंद पडल्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या अधिक असते, असा ताजा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला आहे.
निरोगी हृदयासाठी करा दिनचर्येत बदल
हृदयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संघटनेने या अहवालाचा हवाला देत जगाला निरोगी हृदयासाठी दिनचर्येत बदल करण्याची हाक दिली आहे. असंसर्गजन्य रोग मृत्यूच्या घटना 2025 पर्यंत 25 टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. रोज नियमित चालण्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते. असा संदेश यातून देण्यात आला आहे. हा धागा पकडत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्या निमित्त साधलेल्या संवादात संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांतीदास लुंगे म्हणाले, कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे मृत्यू आणि अपंगत्व येण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत वाढले आहे. गैर-संसर्गजन्य रोग हे याचे प्रमुख कारण आहे.
मधुमेह, रक्तदाबामुळे बळावतोय
असंतुलित दैनंदिन दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींमुळे आजार होणे सामान्य झाले आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आपली तरुणाई निरोगी ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हृदय निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे. हृदय निरोगी असेल तर शरीर निरोगी राहते. त्यामुळे रोज चालणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. नीमा यांच्याकडून या दिशेने सकारात्मक पुढाकार घेतला जात आहे.