Astronomical phenomena नववर्षाचा खगोलीय चमत्कार ! शुक्रवारी पृथ्वी-सूर्य न्यूनतम अंतरावर

* नव्या वर्षात खगोलीय घटनांची रेलचेल

Top Trending News    02-Jan-2025
Total Views |

                                     astro
 
नागपूर - सूर्याभोवती पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते. या दरम्यान पृथ्वी कधी सूर्यापासून लांब, तर कधी जवळ असते. अशा खगोलीय घटना (Astronomical phenomena) नेहमीच होत असल्या तरी खगोलप्रेमींमध्ये उत्साह वाढविणाऱ्या ठरतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अर्थात 3 जानेवारीला सूर्यापासून पृथ्वीचे अंतर सर्वांत कमी १४.७१ कोटी किमी राहणार आहे. एरवी हे अंतर 15 कोटी किमी असते. या जवळीकीचा जीवसृष्टीवर परिणाम होणार नाही. ही एक खगोलीय घटना (Astronomical phenomena) असल्याचे खगोलतज्‍ज्ञांनी सांगितले.
 
पृथ्वी व सूर्यामधील अंतर कमी असणे या खगोलीय घटनेला (Astronomical phenomena) उपसूर्य म्हणतात. सूर्यावर ज्या भागाचे तापमान कमी होते. त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र 11 वर्षांचे असते. या डागाचा शोध 1843 मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आतापर्यंत 23 चक्र पूर्ण झाले. फेब्रुवारी 2008 पासून 24 वे चक्र पूर्ण झाले आहे. या खगोलीय (khagoliy) घटनेचा जीवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे.
 
नव्या वर्षात खगोलीय घटनांची रेलचेल
 
नव्या वर्षात खगोलीय घटनांची (Astronomical phenomena)रेलचेल आहे. यामध्ये 3 जानेवारीला पृथ्वी व सूर्यादरम्यानचे अंतर कमी आहे. याला ‘पेरेहेंलिऑन’ (perehenlion')म्हणतात, तर 4 जानेवारीला शनी ग्रह काही वेळासाठी चंद्रामागे झाकला जाईल. या घटनेला खगोलशास्त्रात ‘पिधानयुती’ म्हणतात. 20 जानेवारीला शुक्राजवळ शनी दिसेल तर 2 फेब्रुवारीला शुक्र व चंद्राची युती राहील. 8 फेब्रुवारीला पहाटे नरतुरंग उल्का वर्षाव पाहता येईल.
 
खगोलीय घटनांच्या (Astronomical phenomena) रांगेत पुढे 8 मार्चला पश्चिम क्षीतिजावर सायंकाळी बुध ग्रह दिसेल. 14 मार्च रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे भारतातून दिसणार नाही. 20 मार्चला दिवस व रात्र सारखीच राहणार आहे. 6 एप्रिल रोजी चंद्राजवळ मंगळ दिसेल. 22 व 23 एप्रिल रोजी उल्का वर्षाव दिसेल. 4 मे रोजी मंगळ व चंद्राची युती राहील. 24 मे रोजी शनी ग्रह काही काळासाठी चंद्रामागे झाकला जाईल. 21 जून हा वर्षातला सर्वांत मोठा दिवस म्हणजेच 13 तास 13 मिनिटांचा राहील. 4 जुलै रोजी पृथ्वी व सूर्याचे अंतर जास्त राहील. 4 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ तारा व चंद्र यांची पिधानयुती राहील.