Holika Dahan होळी 2025 ! जाणून घ्या महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

Top Trending News    13-Mar-2025
Total Views |
 
holika
 
Holika Dahan हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण दडलेले असते. होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. नवीन वर्ष सुरू होताच लोकं होळीची आतुरतेने वाट बघू लागतात कारण रंगांचा हा सण प्रेम आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. होलिका दहनानंतर Holika Dahan दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो आणि 13 मार्चला होलिका दहन होईल. त्यामुळे 14 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून परस्परातील मतभेद दूर करतात आणि नाती मजबूत करण्याचा प्रयत्न करतात.
 
 
शुभ मुहूर्त
 
होलिका दहन Holika Dahan होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो. पंचांगानुसार, यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 मिनिटांनी सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत 14 मार्च रोजी होलिका दहन Holika Dahan हा सण साजरा केला जाणार आहे.
 
पूजनाची पद्धत
 
होलिका दहनाच्या Holika Dahan दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला करतात. या दिवशी स्त्रिया सकाळी उठतात, आंघोळ करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर पूजेची तयारी करतात. या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्याभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर तेथे धान्य, वस्त्र, फळे अर्पण केली जातात. या दिवशी पूजेत 5 किंवा 7 प्रकारचे धान्य वापरले जाते आणि ते दान करण्याचीही परंपरा आहे. तेथे पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा आणि थोडे पाणी शिंपडा. यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्या आणि स्वतःही ग्रहण करा.
 
प्रल्हाद आणि होलिकाची कथा
 
होलिका दहनानिमित्त Holika Dahan भक्त प्रल्हाद आणि त्याची आत्या होलिका यांची कथा प्रसिद्ध आहे. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा एक महान भक्त होते. त्याचे वडील राक्षस हिरण्यकश्यपू यांना ही भक्ती आवडत नव्हती. त्यामुळे त्याला त्याचा राग यायचा. यासाठी भक्त प्रल्हादाचं वध करण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी हिरण्यकश्यपूने बहीण होलिका हिची मदत घेण्याचे ठरवले. होलिका हिला वरदान होते की ती अग्नीत जळू शकत नाही. म्हणून हिरण्यकश्यपूने तिला प्रल्हादला घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा केली. जेणेकरून भक्त प्रल्हाद जाळून मरेल. प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. त्या चितेमध्ये होलिका Holika Dahan जळून खाक झाली. भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका दगावली.
 
भस्मामुळे अनेक दोष दूर
 
वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी. संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. होळी हा सण रंगांचा असल्यामुळे लहान मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचते. साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे. देशात होळी सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असं असलं तरी हिंदू शास्त्रात होळीतील भस्माला Holika Dahan विशेष महत्त्व आहे. या सणाशी निगडीत बऱ्याच समजुती आणि प्रथा आहे. या भस्मामुळे अनेक दोष दूर होतात, अशी मान्यता आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरे केल्याने चांगले फळ मिळते.
 
 
- होळी सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी आणि भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराची पूजा करावी. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.
 
- होळी दहनावेळी अवश्य सहभागी व्हावे. काही कारणास्तव होलिका दहनाच्या दिवशी शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
 
- होळीमध्ये जवस, वाटाणा, गहू किंवा हरभऱ्याच्या जुड्या यांपैकी जे तुमच्याकडे असेल ते होळीच्या आगीत भाजून प्रसादाच्या रूपात सर्वांना वाटावे.
 
- होळीतील भस्म पुरुषांनी मस्तकावर आणि स्त्रियांनी गळ्याभोवती लावावे. यामुळे समाजात किर्ती वाढते आणि संपत्तीत वाढ होते अशी समज आहे.
 
- होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि काळे तीळ काळ्या कपड्यात बांधा आणि पेटत्या होळीत टाका. असे केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो.
 
- होळीतील भस्म लॉकरमध्ये किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवावी. असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही, अशी मान्यता आहे.
 
- घरामध्ये शेणींची होळी अवश्य करा. तसेच त्यात कापूर जाळावा. असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक उर्जेने भरलेले राहते.
 
- होळीच्या दिवशी वडिलधाऱ्यांच्या पायाच्या बोटांवर गुलाल लावून आशीर्वाद घ्यावा आणि लहानांना रंग लावून आशीर्वाद द्यावा.