Brothel Run By Police Officer सापळा रचला अन्.... धक्क्कादायक सत्य झाले उघड ! पोलिसच चालवत होता कुंटणखाना

Top Trending News    02-Mar-2025
Total Views |
 

police 
 
नागपूर - (Brothel Run By Police Officer) ग्रामीण पोलिस दलातून बडतर्फ पोलिस कर्मचारी हा पत्नीसोबत मिळून घरीच देह व्यवसायाचा अड्डा चालवत होता. गरीब कुटुंबातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देह व्यवसायाच्या नरकात ढकलत होता (Brothel Run By Police Officer). गोपनिय माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत ताजनगर परिसरातील पार्वती सहनिवास येथे त्याच्या घरी धाड टाकली (Brothel Run By Police Officer). चार आरोपींना अटक करून दोन पीडितांची सुटका केली (Brothel Run By Police Officer). अटकेतील आरोपींमध्ये सचिन दिलीप मेश्राम (35), सोनाली सचिन मेश्राम (20) दोन्ही रा. ताजनगर मानकापूर, आकाश अशोक जगनीत (32) रा. कामठी, आणि एका 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन मेश्राम हा नागपूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होता. त्याला एका प्रकरणात सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान ताजनगर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी)ला मिळाली होती. मुख्य आरोपी हा महिलांना ग्राहक पुरविण्याचे काम करत असल्याचे समजले. तपासाअंती समोर आले की, सचिन मेश्राम याने 14 फेब्रुवारी रोजी सोनाली मेश्रामसोबत दुसरे लग्न केले होते आणि तेव्हापासून तो या अपार्टमेंटमध्ये राहत होता. आकाश जगनीत हा दलालीचे काम करत होता. त्याने 48 वर्षीय महिलेच्या मुलीला या ठिकाणी पाठवले होते. तसेच, सचिनची पत्नी सोनाली हिची फेसबुक फ्रेंड कोलकात्याहून नागपूरला आली होती आणि ती देखील त्याच घरात राहत होती.
 
पोलिसांनी पुरावा गोळा करण्यासाठी आपला गुप्त पंटर ग्राहक म्हणून पाठवला. पंटरचा इशारा मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि चारही आरोपींना रंगेहात अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 4 मोबाइल फोन आणि 49,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चारही आरोपींवर पीटा कायद्याच्या विविध कलमांनुसार मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना मानकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, अधिक चौकशी सुरू आहे.