Riot Arrest नागपूर दंगल प्रकरण ! 69 जण अटकेत, 19 ना पोलिस कोठडी, 4 अल्पवयीन

Top Trending News    20-Mar-2025
Total Views |

riots 
 
नागपूर : Riot Arrest महालमध्ये सोमवारी घडलेल्या दंगलीसाठी जबाबदार संशयितांची गणेश पेठ पोलिसांनी धरपकड सुरू केली असून, बुधवारी रात्रीपर्यंत 69 संशयितांना अटक केली आहे. त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मंगळवारी यातील 27 संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत सुनावणी सुरू होती, या दरम्यान फिर्यादी पक्षाने आरोपींचे जबाब नोंदवले. पोलिसांनी पुढील चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी (पीसीआर) मागितली, परंतु न्यायालयाने केवळ 19 जणांना 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली Riot Arrest. सुलताना मैमुना यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
 
 
घटनेच्या तिस-या दिवशी म्हणजेच बुधवारी काही संशयिताना गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी मध्यरात्री उशीरापर्यंत त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत होते. महत्त्वाचे म्हणजे अटक करण्यात Riot Arrest आलेल्या संशयितांमध्ये चार संशयीत अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान जिल्हा सरकारी वकील आसिफ कुरेशी आणि रफिक अकबानी यांच्यासह बचाव पक्षाच्या वकिलांनी चुकीच्या अटकेचा आरोप करत पीसीआर विनंतीला विरोध केला. अटक करण्यात आलेल्यांपैकी ब-याच जणांची दंगलीत कोणतीही भूमिका नव्हती. खरे गुन्हेगार भालदार पुरा येथील स्थानिक रहिवासी नसून बाहेरचे लोक असल्याचा दावा त्यांनी केला.
 
पोलिसांनी खूप दिला चोप
 
दंगलीत 30 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यामुळे पोलिसांचा आरोपींवर रोष होताच. जिल्हा सत्र न्यायालयात सादर करते वेळी सात जणांनी पोलिसांनी अतोनात मारल्याची न्यायालयाला तक्रार केली. यातील दोन जण मेयो रुग्णालयात भरती असल्याचे कळते. न्यायालयाने आरोपींचे म्हणणे ऐकून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.