Intelligence agencies High Alert दंगलचे वादळ येण्यापूर्वी बैठकींची रणनिती, गुप्तचर यंत्रणा हाय अलर्ट !

Top Trending News    21-Mar-2025
Total Views |

riots
 
नागपूर - Intelligence agencies High Alert उपराजधानीत उसळलेल्या हिंसाचाराबाबत आता धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या प्रतीकात्मक कबरीवर कोणतीही धार्मिक चादर टाकली नव्हती, हे पोलिसांनी स्पष्ट केले असले तरी हा हिंसाचार याच मुद्यावरून भडकवण्यात आला. सुरुवातीपासूनच हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा आरोप होत होता आणि आता त्याचे पुरावेही मिळत आहेत. समाजात असंतोष पसरवण्यासाठी आणि जमावाला उग्र करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर Intelligence agencies High Alert करण्यात आला. दुपारपासूनच सोशल मीडियावर 55 पेक्षा अधिक अकाउंट मधून भडकाऊ पोस्ट टाकल्या गेल्या. तपासात या हिंसाचारासाठी तीन ठिकाणी गुप्त बैठक झाल्याचाही खुलासा झाला आहे. पहिली बैठक भालदारपुरा येथे, दुसरी यशोधरानगरमध्ये आणि तिसरी गिट्टीखदान येथील श्याम लॉनजवळील एका घरात घेण्यात आली. या बैठकीत दंगलीची संपूर्ण योजना आखण्यात आली होती.
 
 
ही माहिती पुढे आल्यानंतर आता दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) आणि राज्य पोलिसांची एसआयडी Intelligence agencies High Alert सक्रिय झाली असून हिंसाचाराबाबत माहिती गोळा केली जात आहे. या बैठकींचे आयोजन करणारे तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या बैठकीत समजाला प्रभावित करू शकणाऱ्या काही खास लोकांनाच बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे, 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येत नागपूरमधून अटक झालेला आरोपीही या हिंसाचारात Intelligence agencies High Alert सक्रिय होता, अशी माहिती समोर आली आहे. श्याम लॉनजवळील बंद खोलीत काही लोकांनी मिळून समाजातील लोकांना कसे गोळा करायचे आहे. कुठे-कुठे आणि केव्हा दंगल घडवायची आहे याची योजना आखण्यात आली.
 
महाल आणि आसपासच्या परिसरांमध्ये लोक आंदोलनासाठी गोळा झाले असा समज होता. मात्र, दंगलीची योजना दुसरीकडेच बनत होती. सर्वप्रथम पोलिसांना चिटणीस पार्क परिसरात अडकवून ठेवण्याची योजना आखण्यात आली होती. सामान्यतः अशा घटनांमध्ये पोलिस बंदोबस्त भगवाघर चौकात लावला जातो. त्यामुळे यावेळी दंगेखोरांनी गीतांजली चौकाची निवड केली. छोट्या गल्लींमधून जमाव गीतांजली चौकात पोहोचला आणि तेथे मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. या बैठकीत सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचाही निर्णय घेण्यात आला, जेणेकरून कोणालाही ओळखणे कठीण होईल.
 
फोन संभाषणाच्या नोंदीही मिळाल्या
 
हिंसाचार घडवणाऱ्या मास्टरमाइंडने आपले चेहरे झाकले होते, मात्र जमावात सामील झालेल्या सामान्य लोकांच्या चेहरे झाकलेले नव्हते. त्यामुळे आता तपास यंत्रणा हिंसाचाराची योजना बनविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करीत आहेत. तपास यंत्रणांना सतत फोन संभाषणाच्या नोंदीही मिळाल्या आहेत. कोण कोणाशी कधी बोलले याचा तपास सुरू आहे. लवकरच पोलिसांचे हात त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचतील. हिंसाचारामागे कट-कारस्थान असल्याने गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांशी बैठक घेतली असून, या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याचा विचार सुरू आहे.