Bomb In High Court हायकोर्टात बॉम्बच्या फोनने खळबळ ! आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Top Trending News    25-Mar-2025
Total Views |

high court nagpur
 
नागपूर : Bomb In High Court उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन नियंत्रण कक्षात येताच पोलिस प्रशासनाला घाम फुटला. तात्काळ वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बीडीडीएस पथकाच्या Bomb In High Court माध्यमातून संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र काहीही संशयास्पद मिळाले नाही. या दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने फोन कॉल करणाऱ्याला शोधून काढले. वासवानी हिंगणा येथील एका कंपनीत ऑडिटर आहेत. कुटुंबातील एका महिलेचा न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे ते न्यायालयाच्या खेटा घालत होते. सोमवारी ते खूप तणावात होते. सायंकाळी 4.15 वाजताच्या सुमारास वासवानी यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला.

 
 एका व्यक्तीने त्यांना फोन करून उच्च न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. तसेच त्यांना हायकोर्टात न जाण्यास सांगितल्याची Bomb In High Court बतावणी केली. नियंत्रण कक्षातून तात्काळ हायकोर्ट सेक्युरिटीला सूचना देण्यात आली. चौकशीत त्याने कौटुंबिक प्रकरणात न्याय न मिळाल्याने तो तणावात होता आणि त्यामुळे त्याने ही अफवा पसरवल्याचे सांगितले. ओमप्रकाश वासवानी रा. जरीपटका असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 
सदर पोलिस आणि एटीएमचे पथकही घटनास्थळी पोहोचले. बीडीडीएस पथकाला पाचारण करून संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र काहीही मिळाले नाही. या दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांनी फोन कॉल करणाऱ्याचा शोध लावला. वासवानी यांची ओळख पटताच गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने शोध सुरू केला. जरीपटका येथील घरून वासवानी यांना ताब्यात घेतले. चौकशीत कुटुंबीयांनी वासवानी यांची मन:स्थिती बरोबर नसून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली. पुढील कार्यवाहीसाठी वासवानी यांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी कलम 505 (1) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.