Choksi Extradition चोक्सीला परत आणण्याची चक्रे गतिमान ! भारताच्या प्रयत्नांना यश येणार का ?

Top Trending News    25-Mar-2025
Total Views |

choksi
 
दिल्ली : Choksi Extradition गीतांजली जेम्सचे मालक आणि 13,850 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न गतिमान Choksi Extradition करण्यात आले आहेत. चोक्सीला भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी बेल्जियम सरकारला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. तो सध्या पत्नी प्रीती चोक्सीसह बेल्जियममध्ये राहत आहे.

 
‘एफ रेसिडेन्सी कार्ड’वर बेल्जियममधील अँटवर्प येथे सध्या त्याचे वास्तव्य आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर तो 2018 मध्ये भारतातून अँटिग्वा - बार्बुडा येथे फरार झाला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत 13,850 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. यापूर्वी चोक्सीने आपला पासपोर्ट निलंबित झाल्यामुळे तो भारतात परतू शकत नसल्याचे निमित्त केले होते.