Air Show In Nagpur नागपूरमध्ये थरारक एरोमॉडेलिंग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Top Trending News    26-Mar-2025
Total Views |

aero
 
नागपूर, २५ मार्च : Air Show In Nagpur लेट कर्नल व्ही. डी. परांजपे शाळा, बजाज नगर आणि गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज, सदर, नागपूर येथे भव्य एरो मॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाची ओळख आणि एव्हिएशन क्षेत्राची Air Show In Nagpur आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने हा शो आयोजित करण्यात आला होता.
 
कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे, तसेच डॉ. जी. के. आवारी आणि डॉ. समीर तेलंग (विभागप्रमुख) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
 
फन फ्लाय ग्रुपच्या सदस्यांनी आकर्षक एरो मॉडेलिंग प्रात्यक्षिक Air Show In Nagpur सादर करून प्रेक्षकांना भारावून टाकले. उमेश राऊत, संजय पारधी, श्री बुटी आणि संजय श्रोत्रिय यांनी विविध प्रकारच्या एअर शोचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. हा अद्वितीय शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
 
कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका डॉ. रंजना पारधी, अध्यक्षा शैलाताई फडणवीस आणि भावना खरे उपस्थित होत्या. तसेच इंग्रजी माध्यम विभागाच्या मुख्याध्यापिका कोमल कौर, मराठी माध्यम विभागाचे मुख्याध्यापक बावनकुळे आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आरती मलिये (खेरडे) यांच्यासह शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
या रोमांचक आणि माहितीपूर्ण एरो मॉडेलिंग शोला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयीची आवड अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.