political Musical Counter शहाजीबापू पाटलांचे संगीतातून प्रत्युत्तर ! कामराला गाण्यातून प्रत्युत्तर

Top Trending News    31-Mar-2025
Total Views |

poli 
 
मुंबई :  political Musical Counter स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते त्यांनी यानंतर स्टुडिओची तोडफोड देखील केली. दरम्यान आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील गाण्याच्या माध्यमातून political Musical Counter कुणाल कामराला प्रत्युत्तर दिले आहे.
 
 
कुणाल कामराच्या गाण्याला प्रत्युत्तर political Musical Counter म्हणून ‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया, उद्धवजी को खुशी आया लेकीन ठाणे का टायगर आखो मे अंगार उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया,’ असं गाणं शहाजी बापू पाटील यांनी म्हंटले आहे. दरम्यान कुणाल कामराच्या या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेचे मन दुखावले आहे. त्यामुळे आपन सांगोला येथे कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे बापू यावेळी म्हणाले.
 
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार
 
तसेच महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा कायदा पारित व्हावा, यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे असे देखील बापू म्हणाले.