BJP Women Cricket महिला दिनानिमित्त भाजपचा अनोखा उत्सव, क्रिकेट स्पर्धेची रंगत !

Top Trending News    04-Mar-2025
Total Views |

women
 
नागपूर - BJP Women Cricket नवनवीन उपक्रमांतर्गत यंदा भाजपा महिला आघाडीने क्रिकेट स्पर्धेचे BJP Women Cricket नियोजन केले आहे. यासाठीची जोरदार तयारी सुरू असून आघाडीच्या सर्व मंडळांच्या संघाने सरावही सुरू केला आहे. या स्पर्धेतून महिला आघाडीच्या BJP Women Cricket सदस्य चौकार अन् षटकार ठोकणार आहे. बुधवारपासून हा थरार महालातील चिटणीस पार्क येथे रंगणार आहे.
 
8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. यानिमित्ताने भाजपा महिला आघाडीने BJP Women Cricket ही संकल्पना पुढे केली आहे. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तशी आखणीही केली आहे. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ अर्थात मंडळांच्या प्रत्येक 2 असे 12 संघ असतील. तर, युवती आघाडीच्याही अशाच प्रत्येकी दोन असे 12 संघ असतील. सर्व मंडळ मिळून एक अशी संयुक्त महिला संघ असेल. असे एकूण 25 महिला संघाची नोंदणीही झाली आहे. BJP Women Cricket
  
 
तर, भाजप महिला आघाडीव्यतिरीक्त BJP Women Cricket इतर महिला संघानाही या स्पर्धेत सहभागी होता येईल. भाजपा मंडळांच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजीचा सरावही सुरू केला आहे. रविवारला अनेक मंडळाच्या संघातील सदस्य व खेळाडूंनी चिटणीस पार्कवर सराव केला.
 
भाजपा महिला आघाडीच्या BJP Women Cricket शहराध्यक्षा व माजी नगरसेविका प्रगती पाटील यांनी या स्पर्धेबाबत माहिती दिली. बुधवार, 5 मार्चला स्पर्धेचा शुभारंभ होईल. गुरुवार, 6 मार्चला भाजपा महिला आघाडी वगळता इतर महिला संघाचे क्रिकेट सामने होतील. शुक्रवार, 7 मार्चला केवळ शहरातील भाजपा महिला आघाडीच्या BJP Women Cricket मंडळांमध्ये सामने होतील. शनिवारी, 8 मार्चला युवती संघांमध्ये सामने होतील. यासोबतच स्पर्धेचा समारोप होईल.
 
भाजपा महिला आघाडी BJP Women Cricket आतापर्यंत राजकारणात पक्षासाठी निवडणुकीचे सामने जिंकण्यासाठी तत्पर होती. आता ती खेळाच्या मैदानातही आपली गुणवत्ता दाखवू इच्छित आहे. यासाठीच चिटणीस पार्कवर उतरून नियमित सराव करीत आहे. या स्पर्धेमुळे भाजपाच्या महिला कार्यकर्त्या एकत्र येतील. त्यांच्यातील संवाद वाढेल तसेच पक्षासाठी नवी ऊर्जा यानिमित्ताने प्रत्येक महिला कार्यकर्त्याला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.