नागपूर : Battery car service closed प्रवाशांच्या सोयीसाठीमध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावर उपलब्ध असलेली बॅटरी कार सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि इतर गरजू प्रवाशांसाठी चालवली जात होती. प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडताना किंवा ट्रेनपर्यंत पोहोचण्यास सुलभता मिळावी हा बॅटरी कार सेवेचा Battery car service closed मुख्य उद्देश होता. आता ही सेवा बंद झाल्यामुळे विशेषत: वृद्ध आणि दिव्यांगांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वाढत्या तापमानात प्रवाशांचे हाल
उन्हाचे चटके बसू लागले असून, तापमानातही वाढ होऊ लागली आहे. अशात बॅटरी कारची सुविधा बंद झाल्याने रेल्वे स्थानकात ये-जा करणा-या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा Battery car service closed सामना करावा लागू शकतो. वृद्ध, दिव्यांग व्यक्ती आणि जड सामान घेऊन प्रवास करणा-या प्रवाशांना आता लांबच लांब फलाटांवर आणि फूट ओव्हर ब्रिजवरून चालावे लागणार आहे. डॉ. पूनम मदान यांना आपल्या वृद्ध आईसोबत प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागला. पूर्वी बॅटरीच्या गाडीने स्टेशनवर Battery car service closed सहज जाता येत असे पण आता लांबचे अंतर चालावे लागते. वृद्ध आईसाठी हे खूप कठीण झाले असे त्या म्हणाल्या.
प्रवाशांची मागणी, सेवा सुरू करावी
बॅटरी कारची सेवा लवकरात लवकर पूर्ववत करावी किंवा काही पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवासी व सामाजिक संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. नागपूर स्थानक हे प्रमुख रेल्वे जंक्शन Battery car service closed असून येथून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत बॅटरी कारसारखी सुविधा विशेषत: वृद्ध आणि दिव्यांगांसाठी असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला म्हणाले की, गेल्या काही वर्षात स्टेशनवर बॅटरी कार Battery car service closed ही मूलभूत सुविधा बनली आहे. वयोवृद्ध व दिव्यांग प्रवाशांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देताना विभागीय व्यवस्थापनाने ही सुविधा लवकरात लवकर सुरू करावी.
करार आला संपुष्टात
- गेल्या आठवड्यात बॅटरी कारचा अपघात झाला.
- अचानक ड्रायव्हरला अपस्माराचा झटका आल्याने त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला.
- बॅटरी कार प्रवेशद्वारावरील एका खांबावर आदळली.
- धडकेत एका महिलेसह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
- घटनेच्या वेळी बॅटरी कारमध्ये वृद्ध प्रवासीही होते.
- त्यानंतर विभागीय व्यवस्थापनाने हा करार संपुष्टात आणला.
- यानंतर स्टेशनवरील बॅटरी कारची सुविधा बंद झाली.
- प्रवाशांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून वरील निर्णय घेतल्याचे बोलले जाते आहे.
- मात्र, वृद्ध व दिव्यांग प्रवाशांना पर्याय देण्याऐवजी ही सुविधा बंद करणे अनाकलनीय आहे.