नागपूर - स्वामी रामदेवबाबा Baba Ramdev यांनी मुघल नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, झाशीची राणी, भगत सिंह यांच्यासाठी देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे कांतिकारीच महान होते. परंतु शालेय अभ्यासक्रमात मुघलांचा इतिहास शिकविल्या गेला. इतिहासाच्या पुस्तकातून भारतीय संस्कृती जाणीवपूर्वक हटविण्यात आली, आपण आपली समृद्ध भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांना शिकवू शकलो नाही. यापेक्षा अभ्यासक्रमातून सनातन धर्माचे शिक्षण द्यायला हवे होते, वेददर्शन उपनिषद शिकवायला हवे होते असे रामदेव बाबा Baba Ramdev म्हणाले. भारतीय शिक्षण पद्धती बदलावी यासाठी देशभर उभारलेल्या आंदोलनाची आठवण करून देताना पुढे ते म्हणाले, खोटी शिक्षा व्यवस्था बदलण्याची गरज होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय शिक्षण पद्धती बदलविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे योगदान दिले. मुलांना वेददर्शन उपनिषदांचे शिक्षण मिळायला हवे असे रामदेवबाबा म्हणाले.
नागपूरच्या मिहान परिसरात पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्धघाटन झाले. यावेळी रामदेव बाबा Baba Ramdev बोलत होते. मंचावर राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, स्वामी रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण, भाजपाचे राष्ट्रीय संघटन सहमंत्री शिव प्रकाश प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, विदर्भातील शेतकरी कोरडवाहू शेतीवर कापूस व सोयाबीनचे पीक घेतात तसेच मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड करतात. परंतु संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने विदर्भीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी विदर्भात दहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या. या संकटावर मात करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी स्वामी रामदेवबाबांना Baba Ramdev पतंजलीचा मेगा फूड प्रोसेसिंग युनिट नागपुरात उभारावा अशी विनंती केली. आज या विशाल कार्याचा शुभारंभ होतोय, याचा आनंद वाटतो. या माध्यमातून विदर्भातील शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्धीची कास धरणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. प्रसंगी त्यांनी असून, रामदेव बाबांचे अभिनंदनही केले.
पतंजलीचा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प संत्रानगरीत सुरू झाला याचा आनंद वाटतो. रामदेव बाबांनी Baba Ramdev विदर्भातील शेतकऱ्यांना संत्र्याचा योग्य भाव मिळावा यासाठी 12 ते 13 रुपये किलो दराने विकल्या जाणारा संत्रा 18 रुपये किलोने विकत घेण्याचा संकल्प घेतला ही समस्त शेतकऱ्यांसाठी फार मोठी गोष्ट आहे. या प्लांटला दिवसाला ८०० टन संत्र्यांची आवश्यकता भासणार असून, विदर्भात संत्र्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतील. तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून संत्र्याचे उत्पादन वाढविण्यावरही भर देणार असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
पतंजलीचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान - देवेंद्र फडणवीस
पतंजलीचे Baba Ramdev केंद्र विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फळांवर प्रक्रीया केल्याशिवाय योग्य दर मिळणे कठीण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत संत्र्यासह सर्वच फळांचे येथे प्रोसेसिंग सुरू होईल. विदर्भात मेगा फूड पार्क असावा अशी आमच्या सर्वांची इच्छा होती. आपल्याकडे अन्न प्रक्रिया केंद्र नसल्याने मोठे नुकसान व्हायचे. आता पतंजलीने देऊ केलेल्या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून सर्वांना दीर्घकाळासाठी संत्र्याची साठवणूक करता येईल. त्यामुळे पिकांची नासाडी टाळता येईल असे ते म्हणाले. नागपूर विमानतळावरील अत्याधुनिक धावपट्टीबाबत बोलताना, सगळ्या प्रक्रिया पार पडल्या आहेत. प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी गेला असून, धावपट्टीचे काम लवकरच सुरू होईल असे फडणवीस म्हणाले.
नागपूरची भूमी अध्यात्म क्रांतीची भूमी - आचार्य बालकृष्ण
पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे एमडी आचार्य बालकृष्ण म्हणाले, नागपूरची ही भूमी अध्यात्म आणि क्रांतीची भूमी आहे Baba Ramdev . ही भूमी देश आणि संविधानाला मूर्त स्वरूप देणारी आहे. आता या भूमीतून पतंजलीच्या नवकृषी क्रांतीद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीचे दरवाजे उघडले जातील. हा प्लांट खाद्य प्रक्रिया क्षेत्रातील सिंगल पॉईंट आणि आशियातील सर्वात मोठी युनिट आहे असे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले.