तेल्हारा/अकोला (ता. प्र.) : WhatsApp Status Suicide शिलानंद माणिकराव तेलगोटे (39, रा. शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा) असे मृत तलाठ्याचे नाव असून तो तेल्हारा तहसील कार्यालयांतर्गत हिवरखेड तळेगाव बाजार कार्यरत होता. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ‘व्हॉटसॲप’वर एक स्टेटस ठेवले. त्यामधून आत्महत्येमागील WhatsApp Status Suicide कारण स्पष्ट झाले. मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहराही दाखवू नका, असे व्हाट्सअप स्टेटस पत्नीच्या छळाने त्रस्त एका तलाठ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना तेल्हाराच्या थार एमआयडीसी परिसरात रविवारी ( दि. 30) घडली. पोलिसांनी या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
शिलानंद यांनी मृत्यू पूर्वीच्या स्टेटसमध्ये WhatsApp Status Suicide पत्नी आपला मानसिक छळ करते. मृत्यूनंतर चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेही नमूद केले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुनील भटकर यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.
असा ठेवला स्टेटस
आत्महत्येपूर्वी शिलानंद तेलगोटे यांनी ठेवलेले स्टेटस प्रसिद्धी माध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. मला माझी पत्नी मुलासमोर शिव्या देत असून फाशी घे असे वारंवार म्हणते. तसेच माझ्या साळ्याकडे पैसे असून त्यापोटी मी व्याज भरतो आहे. माझ्या पगारातून कपात होत आहे. मी पाच दिवसांपासून जेवण केले नाही. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला माझा चेहरा देखील दाखवू नका, असे त्यात म्हटले आहे.