Aligarh Relationship Love : सासू जावयाच्या अफेअरने घरात वादळ ! प्रेमासाठी केली नात्याची सीमा पार

Top Trending News    10-Apr-2025
Total Views |
 
love aff
 
अलीगढ : ( Aligarh Relationship Love ) उत्तर प्रदेशात भावी जावयासोबत त्याची होणारी सासू पळून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. होणार्‍या जावयासह पळून जाताना महिलेने सोबत अडीच लाख रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिनेही नेले. तिच्या मुलीच्या लग्नाची वरात 8 दिवसांनी येणार होती, पण त्याआधीच सासू तिच्या होणार्‍या जावयासह पळून ( Aligarh Relationship Love ) गेली. या प्रकरणात, महिलेच्या पतीच्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.
 
 
अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील रहिवासी असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न दादोन पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी निश्चित ( Aligarh Relationship Love ) केले होते. त्यांच्या मुलीच्या लग्नाची वरात 16 एप्रिल रोजी येणार होती. नातेवाईकांना लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती, पण वधूची आई तिच्या होणार्‍या जावयासह पळून गेली आणि तिचे पैसे आणि दागिने घेऊन गेली. सतत रडल्यामुळे महिलेच्या मुलीची प्रकृती बिघडली आहे. होणार्‍या वराने त्याच्या वडिलांना फोनवर सांगितले की शोधण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही परत येणार नाही.
 
दोघांमध्ये होते प्रेमसंबंध
 
मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जावई घरी येत असे. तो त्याच्या भावी सासूसोबत तासनतास एकटाच राहत असे. कुटुंबातील सदस्यांना वाटले की जावई आणि सासू लग्नाची तयारी ( Aligarh Relationship Love ) करत आहेत. जावयाने काही दिवसांपूर्वी त्याच्या सासूला मोबाईल फोनही भेट दिला होता. दोघेही गुपचूप बोलत असत. जावई आणि सासूमध्ये प्रेमसंबंध सुरू असल्याचा कोणाला संशयसुद्धा आला नाही.
 
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या संदर्भात माहिती देताना मद्रक पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार म्हणाले की, महिलेच्या पतीने लेखी तक्रार दिली आहे. यानंतर, महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि तिचा शोध घेतला जात आहे. तो मुलगाही त्याच दिवसापासून बेपत्ता आहे, पण दोघेही एकत्र कुठेतरी गेले आहेत की नाही हे स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण घटना स्पष्ट होईल.