चिक्कमंगळुरू : ( Bus Crashed On Roof ) कर्नाटकातील चिक्कमंगळुरूमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. हा अपघात आगळावेगळा असल्यानेही जास्त चर्चेत आहे. बस नियंत्रणाबाहेर गेली, खड्ड्यात पडल्यानंतर घराच्या छतावर चढली यावरून अपघाताची तीव्रता अंदाज येऊ शकते. बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. या घटनेत बस चालक आणि एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली तर अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
बुधवारी कोप्पा तालुक्यातील जलदुर्गा येथे एक रस्ता अपघात झाला. चिक्कमंगळुरुहून श्रृंगेरीकडे जाणारी राज्य परिवहन कंपनीची केएसआरटीसी बस जयपुराजवळील ( Bus Crashed On Roof ) जलदुर्गा येथे अचानक नियंत्रण सुटली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. ही बस उतारावर बांधलेल्या घरावर चढली. घटनेच्या वेळी, परिसरात हलका पाऊस पडत होता, ज्यामुळे रस्ते निसरडे झाले होते. यामुळे चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. बस पडल्याने घराच्या छतालाही नुकसान झाले आहे.