Aurangzeb Tomb Controversy : औरंगजेबाची कबर थेट संयुक्त राष्ट्रात ! मुघल वंशजांची संरक्षणाची मागणी

Top Trending News    17-Apr-2025
Total Views |

auragj 
 
छत्रपती संभाजीनगर : ( Aurangzeb Tomb Controversy ) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरून मागील काही दिवसांपासून मोठा वाद सुरु झाला होता. याच दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा ( Aurangzeb Tomb Controversy ) आता संयुक्त राष्ट्रांकडे पोहोचला आहे. मुघल बादशाह बहादूरशाह जफर (अखेरचा) याचे वंशज याकूब हबीबुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहिले आहे. त्याने मुघल बादशाहा औरंगजेब याच्या कबरीच्या संरक्षणाची करण्याची मागणी केली आहे.
 
असे आहे प्रकरण
 
गेल्या महिन्यात नागपूर मध्ये औरंगजेब बादशाहच्या कबरीला ( Aurangzeb Tomb Controversy ) हटवण्याच्या मुद्द्यावरून मोठा तणाव निर्माण झाला. या मुद्द्यावर संघर्ष होऊन काही भागांमध्ये हिंसाचार पसरला. विविध समुदायांमध्ये वाद सुरू झाला, ज्यामुळे सार्वजनिक शांतता आणि सौहार्दाला धोका निर्माण झाला. पोलीस आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. तसेच, हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई केली. तसेच या घटनेनंतर महिनाभरात हा विषय संयुक्त राष्ट्रांसमोर पोहोचला आहे.
 
 
औरंगजेब बादशाहाची ही कबर वक्फची संपत्ती असून, प्रिंस याकूब हे तिचे मुतवल्ली (विश्वस्त) आहेत. याबाबत प्रिंस याकूब यांनी सांगितले की, औरंगजेबाची ही कबर राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित झालेली आहे. तसेच, तिला प्राचीन स्मारके, पुरातात्त्विक ठिकाण आणि अवशेष अधिनियम 1958 अन्वये संरक्षण प्राप्त आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस यांना लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये या अधिनियमातील तरतुदींनुसार संरक्षित स्मारकाच्या जवळपास कुठल्याही प्रकराचं अनधिकृत बांधकाम, बदल, खोदकाम आदी करता येत नाही. अशा कुठल्याही कृतीला बेकायदेशीर आणि दंडात्मक मानले जाते, असे ते म्हणाले. तसेच या कबरीच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.