नागपूर : ( Electricity Security Deposit ) एकीकडे वीज चोरी करणाऱ्यांना मोकळं रान आणि वर्षानुवर्षे बिल थकीत ठेवणाऱ्यांना अभय योजना तर दुसरीकडे वेळेवर बिल भरत असलेल्या प्रामाणिक ग्राहकांच्या खिशावर ३७३ कोटींचा भार आता दिला जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या वीज बिलासोबतच महावितरणने ( Electricity Security Deposit ) प्रत्येक घरगुती ग्राहकाला ३,७३० रुपयांचा ‘सिक्युरिटी डिपॉझिट’चा ( Electricity Security Deposit ) वेगळा झटका दिला आहे. जिल्ह्यात सुमारे १० लाख घरगुती ग्राहक असून, त्यांच्या खिशातून कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी महावितरणने हे पाऊल उचलले आहे. सध्या परिस्थिती अशी की, वीज चोरी करणारे वा थकीत ग्राहक सुटतात, पण नियमितपणे बिल भरणाऱ्या सामान्य ग्राहकांनाच आर्थिक दंड दिल्यासारखी वागणूक मिळत आहे.
एसीत फुटला ग्राहकांना घाम
उन्हाळा सुरू असल्याने घरांमध्ये कूलर, एसीच्या वापरामुळे आधीच ग्राहकांना किमान 2 ते 5 हजारांपर्यंतची बिले आली आहेत. त्यात 3,730 रुपयेही मागण्यात आल्याने एसीमध्ये बसणाऱ्यांनाही घाम फुटला. एकाच महिन्यात पाच ते दहा हजार रुपये कसे भरणार, असा पहिला प्रश्न ग्राहकांपुढे उभा ठाकला आहे. महावितरणमधील सुत्रानुसार ( Electricity Security Deposit ) जिल्ह्यात 10 लाखांवर ग्राहक आहेत. प्रत्येकाकडून ही रक्कम वसुल केल्यास जिल्ह्यातील ग्राहकांच्या खिशाला एकूण 373 कोटींचा भुर्दंड बसणार आहे.
महावितरणने याच आठवड्यात मार्चमधील वीज वापराची बिले ग्राहकांकडे पाठवली. जिल्ह्यातील 10 लाखांवर घरगुती ग्राहकांकडे ही बिले पोहोचली. ग्राहकांना नियमित धक्का देण्याचे जुनेच तंत्र कायम महावितरणने वापरले आहे. या बिलांसोबत महावितरणने आणखी एक बिल पाठवले आहे. यातून अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाने 3,730 रुपयांचा भरणा करण्याच्या सूचना ( Electricity Security Deposit ) केल्या आहेत. त्यामुळे अनेक घरगुती ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अभय योजना
मागील 2024 मध्ये महावितरणने राबविलेल्या अभय योजनेतून 4,934 डिफॉल्टर ग्राहकांची 9 कोटी 29 लाख 86 हजार रुपये माफ केले. एवढेच नव्हे या योजनेला 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढही दिली होती. त्याचवेळी नियमित वीज बिलाचा भरणा करणाऱ्यांच्या खिशातून आगावू रक्कम काढण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महावितरण वीज बिले थकीत ठेऊन चोरीच्या विजेचा वापर करणाऱ्यांसाठी अभय योजना राबविते. यात थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कही माफ करते. यासाठी जनजागृती केली जाते, त्यावर वेगळा खर्च तसेच योजना राबविण्यासाठी यंत्रणेला गुंतविले जाते.
‘एक्स’वरून थकबाकीची माहिती
विशेष म्हणजे महावितरणकडून थकबाकीदारांचा उदो उदो केला जात आहे. महावितरणच्या ‘एक्स’ सोशल मीडिया खात्यावरून अभय योजनेतून किती घरे प्रकाशमान झाली, याबाबत एक पोस्ट 19 मार्च 2025 रोजी करण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचे दिसून येत आहे.
देशात एका गैरराजकीय संघटनेकडून काही करायचे असल्याचे पाण्यात दगड मारून फेकण्याचा प्रकार केला जातो. जमलं तर ठीक प्रतिक्रिया विरोधात उमटल्या तर काही काळासाठी माघार घेणे, हा या संघटनेचा फार्म्युला आहे. याच फार्म्युल्याचे अनुकरण गेल्या काही वर्षांपासून महावितरण करीत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. १० लाखांवर घरगुती ग्राहक आहेत. यातील सर्वच ग्राहक ओरडतात. परंतु, 15 टक्के ग्राहक असे आहेत, जे या आगावू रकमेचा भरणा करीत असते. त्यामुळे साडेपाच कोटीपर्यंत वसुलीसाठी महावितरणला कोणताही त्रास नाही, अशी चर्चा महावितरणमधील अधिकाऱ्यांतही रंगलेली दिसत आहे.