Siddhivinayak Bhagyalakshmi Blessing सिद्धिविनायक ट्रस्टची सौगात ! मुलींना 10 हजार रुपये, आईच्या नावे मुदत ठेव

Top Trending News    02-Apr-2025
Total Views |
 
shri
 
मुंबई :  Siddhivinayak Bhagyalakshmi Blessing मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ Siddhivinayak Bhagyalakshmi Blessing राबविण्यात येत आहे. यातून मुलींना 10 हजार रुपये मिळणार आहेत. राज्यात शासकीय रूग्णालयात 8 मार्च रोजी जन्मास आलेल्या बालिकांच्या नावे 10 हजार रुपयांचे मुदत ठेव त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याची ही योजना आहे.
 
मंदिर ट्रस्टतर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या लेक वाचवा, लेकीला शिकवा या स्वरूपाचा धोरणाला मंदिर न्यासाचाही हातभार लागावा हा हेतू या योजनेमागे आहे.
 
जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्मलेल्या बालिकांना योजनेचा लाभ देण्याच्या प्रस्तावाची घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे. त्यानंतर योजनेसाठीचे निकष जाहीर करण्यात येतील, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे. सरत्या आर्थिक वर्षात ट्रस्टला 133 कोटींचे उत्पन्न मिळाले. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 15 टक्के आहे. 2025-26 या पुढील वर्षासाठी अपेक्षित उत्पन्न 154 कोटी गृहीत धरण्यात येत आहे.