Sunitas Cosmic India हिमालय लहरींसारखा भारत ! सुनीता विल्यम्सचा अनोखा अनुभव

Top Trending News    02-Apr-2025
Total Views |

sunita w
 
न्यूयार्क : Sunitas Cosmic India भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स Sunitas Cosmic India या 9 महिन्यांनंतर नुकत्याच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतल्या आहेत. अंतराळातील त्यांच्या नऊ महिन्यांच्या दीर्घ वास्तव्यादरम्यान तिथून भारत कसा दिसतो, याबद्दल त्यांचा अनुभव सुनीता विल्यम्स यांनी सांगितला आहेत. त्यांनी सांगितलेल्या या अनुभवत काही विशेष लोकांचा विशेष उल्लेख केला आहे. विल्यम्स यांनी सांगितले की हिमालय, मुंबई आणि गुजरातच्या किनाऱ्यावरील मच्छिमारांचा खास उल्लेख आहे. भारत हा खरोखरच अद्भुत आहे. आम्ही जेव्हा जेव्हा हिमालयावरून गेलो तेव्हा तेव्हा माझे सहकारी बुच विल्मोर यांनी हिमालयाचे काही अविश्वसनीय फोटो टिपले होते. ते फोटो खरोखरच आश्चर्यकारक करणारे आहेत. अंतराळातून हिमालय लहरींसारखा दिसतो, असे सुनीता विल्यम्स यांनी सांगितले.
 
 
भारताला भेट देण्याची इच्छा
 
सुनीता यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या वडिलांच्या मातृभूमीशी पुन्हा जोडले जायचे आहे. मला आशा आहे की मी माझ्या वडिलांच्या देशात जाईन. तिथे मी अ‍ॅक्सिओम मिशनवर जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांनाही भेटेन. आम्ही आमचे अनुभव त्यांच्यासोबत शेअर करू. सुनीता यांनी अंतराळ संशोधनातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले असून, भारताच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी भारताचे वर्णन एक ‘महान देश’ आणि ‘अद्भुत लोकशाही’ असे केले.