Bihar Election Strategy बिहार विजयासाठी भाजपची मोठी खेळी ! 225 जागांचे लक्ष्य, मजबूत रणनिती

महाराष्ट्र पॅटर्न ठरणार यशस्वी ?

Top Trending News    03-Apr-2025
Total Views |

BJp
पाटणा : Bihar Election Strategy सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. तर काँग्रेस, राजद व डाव्या विचारसणीचे पक्ष विरोधी गटात आहेत. आता एनडीएने बिहारमधील 243 पैकी 225 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बिहारची निवडणूक Bihar Election Strategy भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी खडतर असण्याची शक्यता आहे. राज्यातील वाढते स्थलांतर, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवरून नितीश कुमार सरकारला सत्ता विरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळ या राज्यांच्या विधानसभा निवडणुका 2026 मध्ये होणार आहे. त्याआधी बिहारची निवडणूक जिंकणे रालोआसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीमुळे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बळकटी मिळेल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने जोरदार पुनरागमन केले. त्याच अनुषंगाने बिहारमध्ये Bihar Election Strategy देखील सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.
 
हेही वाचा -
महाराष्ट्र पॅटर्न ठरणार यशस्वी ?
 
महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले. दिल्लीत आम आदमी पार्टीला सत्तेतून बाहेर करत भाजपाने तब्बल 27 वर्षांनंतर राजधानीत सत्ता स्थापन केली. यानंतर आता या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अलिकडेच 30 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी बिहारचा दौरा केला होता. त्यांचा हा दौरा बिहार निवडणुकीच्या Bihar Election Strategy अनुषंगाने महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, अमित शाहा यांनी बिहारमधील भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर दोन दिवस घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एकजुटीवर भर दिला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांचाही उल्लेख केला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपर्यंत दर महिन्याला राज्याचा दौरा करतील, असेही शहा यांनी यावेळी सांगितले. याशिवाय बिहार दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षाशी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाच्या 84 आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी दिली. या निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. राज्यात बूथ व्यवस्थापन तसेच लाभार्थी योजनांची अंमलबजावणी यामुळे भाजपाला मोठे यश मिळाले आहे. भाजपाच्या राज्य नेतृत्वाशी संवाद साधताना अमित शाह यांनी पक्षाला भाजपाचे पारंपरिक मतदार नसलेल्या बूथवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही पक्षाने याच मॉडेलचे अनुसरण केले होते.