Global Recession : जगभरात मंदीची झळ ! ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ

Top Trending News    05-Apr-2025
Total Views |

trump
 
दिल्ली : ( Global Recession ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'रेसिप्रोकल टॅरिफ' जाहीर केले असून, यामुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे. अर्थतज्ज्ञ स्वामिनाथन अय्यर यांनी या दिवसाला 'मंदीचा दिवस' ( Global Recession ) असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी याला 'मुक्तीचा दिवस' ( Global Recession ) म्हटले असले तरी, अय्यर यांच्या मते, हे टॅरिफ पुरवठा साखळीला खंडित करेल, आर्थिक वाढीला धक्का देईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेला अस्थिरतेत ढकलतील. “ट्रम्प यांनी याला मुक्तीचा दिवस म्हटले. मला वाटते, याला मंदीचा दिवस ( Global Recession ) म्हणायला हवे,” असे अय्यर यांनी सांगितले.
 
 
अय्यर यांनी या टॅरिफला आर्थिक वेडेपणाचे उत्तम उदाहरण म्हटले असून, 1930 च्या संरक्षणवादी स्मूट-हॉले टॅरिफशी त्यांची तुलना केली, ज्यांनी महा मंदीला आणखी गंभीर बनवले होते. हा धडा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो. पण ट्रम्प आणि त्यांच्या आर्थिक मंत्रिमंडळाला याचा प्रभाव दिसत नाही, असे ते म्हणाले. त्यांनी इशारा दिला की, या टॅरिफमुळे व्यापार युद्धे सुरू होतील आणि जागतिक मंदी येईल. ट्रम्प यांच्या नवीन धोरणानुसार, भारताच्या अमेरिकेतील निर्यातीवर 26% टॅरिफ लागेल तर चीनवर 34% आणि व्हिएतनामवर सर्वाधिक 46% शुल्क लादले जाईल. युरोपियन युनियन वर 20%, दक्षिण कोरियावर 25%, जपानवर 24%, तैवान वर 32%, युनायटेड किंगडम वर 10%, स्वित्झर्लंड वर 34% आणि ब्राझीलवर 10% टॅरिफ लावले आहे.
 
ट्रम्प यांना असे वाटते की, टॅरिफ धोरण अमेरिकेला उत्पादन क्षेत्रात महासत्ता बनवेल पण असे नाही. अय्यर यांच्या मते, हे धोरण आर्थिक आपत्ती ठरणार आहे. अय्यर म्हणाले, ट्रम्प 1896 च्या मॅकिन्ले युगात परत जात आहेत. मी म्हणेन, 1930 च्या स्मूट-हॉले टॅरिफकडे पाहा, ज्यांनी तुमचा देश आणि जग उद्ध्वस्त केले.