हिंगोली : ( Hingoli Well Tragedy ) हिंगोली जिल्ह्यात हळद काढणीसाठी 11 मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातात 8 महिलांचा जागीच मृत्यू झाला. वसमत तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी 7 वाजता हा भीषण अपघात घडला. हे सर्व मजूर वसमत तालुक्यातील ( Hingoli Well Tragedy )गुंज येथील आहेत. या घटनेने गुंजगावात शोककळा पसरली आहे.
माहिती मिळताच, नांदेड व हिंगोली पोलिस( Hingoli Well Tragedy )वसमतच्या तहसीलदार शारदा गवळी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील पाणी चार मोटारद्वारे उपसण्यात आले. यानंतर जेसीबीच्या मदतीने मयतांचे पार्थिव काढण्यात आले. तातडीने सुरू झालेल्या मदत कार्यामुळे तिघांचे प्राण वाचले. चोतराबाई माधव पारधे, सिमरन संतोष कांबळे, सपना राजू राऊत, ज्योती इरबाजी सरोदे, सरस्वती लखन बुरूड, ताराबाई सटवा जाधव, धुरपता सटवा जाधव अशी मृत महिलांची नावे आहेत.
अपघात कसा घडला ?
हिंगोली Hingoli Well Tragedy जिल्ह्यातील गुंज गावातील 10 महिला आणि 1 पुरुष मजूर हळद काढणीसाठी आलेगाव शिवारात जात होते. मात्र, ट्रॅक्टर चालकाचा अंदाज चुकल्याने वाहन थेट खोल विहिरीत कोसळले. अचानक घडलेल्या या घटनेने स्थळावरच हाहाकार माजला. तीन तासांपासून मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. साधारणत: सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मदतकार्य सुरु झाले. विहिरीत भरपूर पाणी आणि गाळ असल्याने ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला. या अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला असून, 2 महिला आणि 1 पुरुष बचावले आहेत. विहिरीत अजूनही काही मृतदेह अडकले असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शोधकार्य वेगाने सुरू आहे.
गाळ ठरला बचाव कार्यात अडथळा
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आपल्यापरीने बचावकार्य सुरू केले. मात्र, विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळ असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गुंज गावावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश आणि रडारड यामुळे संपूर्ण गाव हळहळत आहे. या घटनेने शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. आता प्रशासन या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी संवेदना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.