( PM Modi ) जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी अधिक निरोगी जगाची निर्मिती करण्याबाबतच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सरकार आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवेल आणि लोकांच्या निरोगी जीवनाशी संबंधित विविध पैलूंना विचारात घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करेल, असे मोदी म्हणाले. उत्तम आरोग्य हा प्रत्येक प्रगतिशील समाजाचा पाया आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः
“ जागतिक आरोग्य दिनी आपण सर्वांनी अधिक निरोगी जगाची उभारणी करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करुया. सरकार आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवेल आणि लोकांच्या निरोगी जीवनाशी संबंधित विविध पैलूंना विचारात घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करेल. उत्तम आरोग्य हा प्रत्येक प्रगतिशील समाजाचा पाया आहे !”