कोल्हापूर : ( Prashant Koratkar Case ) छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याच्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी प्रशांत कोरटकरवर ( Prashant Koratkar Case ) अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. ॲड. असीम सरोदे यांच्यातर्फे इंद्रजित सावंत यांनी कारागृहाच्या पत्यावरच कोरटकरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. न्यायालयात कोरटकरच्या जामीनावर सुनावणी होत असतानाच अब्रुनुकसानीची नोटीस ( Prashant Koratkar Case ) पाठवल्याने जामीन मिळणार की, कोठडीतील मुक्काम वाढणार, हे पाहावे लागणार आहे.
न्यायालयात प्रशांत कोरटकरने ( Prashant Koratkar Case ) दाखल केलेल्या जामीन अर्जात त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजित यांनी अनेकदा स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला. तसेच सावंत यांच्यावरच सामाजिक तेढ निर्माण करण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत. त्यांना अटकही झाली होती, अशी खोटी माहिती दिली होती. त्यातून इंद्रजीत सावंत यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आक्षेप त्यांनी न्यायालयात केल्यावर प्रशांत कोरटकरतर्फे ( Prashant Koratkar Case ) ते परिच्छेद रद्द करीत असल्याचे न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सांगितले होते.
ॲड. योगेश सावंत यांनी स्वतः कोल्हापूर कारागृहात जाऊन इंद्रजित सावंत यांच्यातर्फे आरोपी प्रशांत कोरटकरला अब्रुनुकसानीची नोटीस कारागृह अधीक्षक अविनाश भोई यांच्या हस्ते देण्यात आली. याआधी कोर्टाने कोरटकरला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, कोरटकरने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता.
जामिनावर 9 एप्रिलला निर्णय
सहा दिवसांपूर्वी कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यावर कोरटकरने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. जामिनाबाबतचा निर्णय 9 एप्रिलला दिला जाणार आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकरचा कारागृहातील मुक्काम 9 एप्रिलपर्यंत वाढला आहे, अशी माहिती ॲड. असीम सरोदे यांनी दिली.
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
तपास अपूर्ण असताना प्रशांत कोरटकरला जामीन देणे योग्य नाही, याबाबतची मांडणी आम्ही आज कोर्टात केली. या केस संदर्भातला घटनाक्रम आणि वस्तुस्थिती आपण पाहिली तर असे दिसते की, प्रशांत कोरटकरला जेव्हा इंद्रजीत सावंतांना फोन करावा वाटला तेव्हा त्याने त्यांना रात्री 12 वाजेनंतर फोन केला. फोन करून त्याने इंद्रजीत सावंतांना शिवीगाळ केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वाईट भाषा वापरत वक्तव्ये केली. कोरटकरकडून मराठा आणि ब्राह्मण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही पहिली वस्तुस्थिती आहे, असे ॲड. असीम सरोदे म्हणाले...