१९९२ मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्या किंग खानची क्रेझ फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण जगभरात आहे. तीन दशकांपेक्षा अधिक काळ तो प्रेक्षकांच्या मनावर तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहे. अशा या "हजारो दिल की चाहता" असणाऱ्या "किंग खानाला" वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
किंग खानचा आज 59 वा वाढदिवस असून त्याचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 मध्ये नवी दिल्लीत झाला होता. तर, 1992 मध्ये त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
एका चित्रपटासाठी कोट्यवधींच मानधन घेणाऱ्या किंग खानाची एकूण संपत्ती तब्बल 7300 कोटी रुपये आहे. तर, हुरुन इंडिया रिच लिस्टच्या 2024 च्या यादीमध्ये सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये या अभिनेत्याच्या समावेश झाला आहे.
आज किंग खान आलिशान अशा मन्नत बंगल्यात राहतो. मन्नत ही 6 मजली असून ती 27,000 स्क्वेअर फूट मध्ये पसरली आहे. या बंगल्यात लिफ्टने फिराव लागत. यात अलिशान बेडरूम, लिव्हिंग एरिया, जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, पर्सनल ऑफिस, लायब्ररी, प्रायव्हेट मूव्ही थिएटर, ऑडिटोरियम, वॉक-इन वॉर्डरोब अशा अनेक सुविधा आहेत. या बंगल्याची किंमत २०० कोटी रूपये आहे.
एका चित्रपटासाठी किंग खान १०० ते १२० कोटी रुपये चार्ज करतो. काही चित्रपटासाठी त्याची फी २५० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितल्या जाते. बॉलिवूड चा किंग हा इतर अनेक मार्गानी सुद्धा आपली कमाई करतो. त्यात ब्रँड एंडोर्समेंट, आयपीएल, रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊस अशा अनेक माध्यमातून तो कमावतो.