"स्वतंत्र विदर्भासाठी लढा अखंड !" - विराआस

17 Dec 2024 21:56:11

                                 vidarbh
 
विदर्भ राज्य आंदोलन समितीने (Vidarbha Rajya Andolan Samiti ) स्वतंत्र विदर्भ ( independent Vidarbha) राज्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरवठा करीत आहेत. 16 डिसेंबर 2024 विधानसभेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रवादी 'चले जाओ' म्हणत 'अबकी बार विदर्भ की सरकार' चा नारा बुलंद करीत आहे. या स्वतंत्र विदर्भाच्या ( independent Vidarbha )आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र विदर्भ (independent Vidarbha) राज्य मिळविण्याचा निर्धार करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने (Vidarbha Rajya Andolan Samiti ) हुंकार भरली. नव्या बसलेल्या केंद्र व राज्य सरकारला शेतकरी आत्महत्या चौकशी का केली नाही ? सोयाबीन, कापसाला भाव का दिला नाही ? गोसेखुर्द (Gosekhurd) प्रकल्प का पूर्ण झाला नाही ? विदर्भात ओसाड गावे का म्हणून ? आमच्या तंत्रशिक्षित विद्यार्थीना विदर्भात नौकऱ्या का नाही ? साप हा वन्यजीव चावून मारणाऱ्या माणसाला आर्थिक मदत का दिली जात नाही ? अधिवेशन 3 आठवडे का नाही ? असे 7 प्रश्न विचारण्यात आले. 
 
अशा आहेत मागण्या
 
या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी तसेच शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडिंग बंद करावे. स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, विदर्भ वैधानिक मंडळ नको, अन्न -धान्यावरील जी. एस. टी तात्काळ रद्द करावी, साप चावून मारणाऱ्या व्यक्तीस इतर वन्यप्राण्या प्रमाणे मदत मिळावी. अतिवृष्टी मुळे झालेल्या पीक नुकसानाची भरपाई तात्काळ देण्यात यावी, पीक बिमा धारक शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची मदत देण्यात यावी. कापूस व सोयाबीन पिकाला इतर राज्याप्रमाणे 30 टक्के भाववाढ देण्यात यावी तसेच दुचाकी सवार मागील व्यक्तीस हेलमेट लावण्याची सक्ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
 
धरणे आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीने (Vidarbha Rajya Andolan Samiti) नेते ऍड. वामनराव चटप , डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, मुकेश मासुरकर, माजी आमदार उपेंद्र शेंडे, तात्यासाहेब मत्ते, सुनील चोखारे, प्रभाकर कोंडबत्तूनवार, नासिर जुम्मन शेख, अशोक पोरड्डीवार, कृष्णाजी भोंगाडे, गोविंद चौव्हाण, मधुसूदन कोवे, मनीषा तिरपूडे, विजय नवखरे, प्रशांत नखाते, ज्योती खांडेकर, गणेश कुसराम, सुदाम राठोड, राजेंद्र आगरकर, कपिल ईद्दे, अंकुश वाघमारे, रियाज खान, गुलाबराव धांडे, भाऊराव वानखेडे, त्रिवेणी भोयर, भाई रजनीकांत यांचे भाषणे झालीत.
 
धरणे आंदोलनाला मधुसूदन हरणे, मितीन भागवत, लक्ष्मी लिचडे, राजेंद्र सिंग ठाकूर, विष्णुपंत आष्टीकर, राजेंद्र सतई, मारोतराव बोथले, भोजराज सरोदे, रत्नाकर जगताप, संजय चौधरी, उमेश कळंबे, वसंतराव वैद्य, राजेंद्र झोटिंग, घिसू खुणे पाटील, आशा वानखेडे, तेजराव रेवतकर, अयुब शेख, शोभा येवले,निलिमा जावळे, माधुरी चौहान, मधू चिंचोलकर, बबन रणदिवे, नीलकंठ राव अंभोरे सह शेकडो विराआस कार्यकर्ते उपस्थितीत होते.
Powered By Sangraha 9.0