जीएसटी परिषदेत महाराष्ट्राचे नेतृत्व मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे !

Top Trending News    19-Dec-2024
Total Views |

                                  tatkare
 
नागपूर : राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर २०२४ च्या जीएसटी (GST) परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कुमारी तटकरे (Aditi Tatkare) यांनी आज विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांकडून जीएसटीबाबत (GST) सविस्तर माहिती घेतली.
 
या बैठकीस राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, विक्रीकर सह आयुक्त किरण शिंदे, विक्रीकर उपायुक्त नंदकुमार दिघे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री कु. तटकरे (Aditi Tatkare) यांनी या पूर्वी झालेल्या जीएसटी (GST) परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याने सुचविलेल्या सुधारणा, नव्याने सुचवावयाच्या सुधारणा, करांमध्ये विविध उद्योग, घटक यांना द्यावयाची सूट तसेच कर रचनेमध्ये सुलभता आणि करदात्यांच्या व्याख्या सुस्पष्ट असण्याबाबतची माहिती घेतली.
 
 
जैसलमेर येथे दि. 20 व 21 डिसेंबर 2024 असे दोन दिवस ही जीएसटी (GST) परिषद होणार आहे. त्याअनुषंगाने इलेक्ट्रीक वाहने, विमा हप्ते, कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांना करांमध्ये सुट देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच काही क्षेत्रांमध्ये करावयाची कर कपात आणि करवाढ, त्यामुळे महसुलामध्ये येणारा फरक याची माहितीही मंत्री तटकरे (Aditi Tatkare) यांनी यावेळी घेतली.