Local Self-Government एप्रिल - मे मध्ये निवडणुकींची रणधुमाळी ! स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रशासकीय कारभार कोण संभाळणार ?

Top Trending News    10-Jan-2025
Total Views |

                                 local
 
मुंबई - विधानसभा निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government) ताब्यात घेण्यासाठी महायुतीचे सरकार कामाला लागले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर एप्रिल मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Local Self-Government) निवडणुका घेण्यासाठी महायुतीने चाचणी सुरू केली आहे.
 
राज्यातील तब्बल 29 महापालिका, 246 नगरपालिका नगरपंचायती, 26 जिल्हा परिषदा, आणि 289 पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government) मुदती 2020 ते 2023 पर्यंत संपल्या आहेत. सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थांवर (Local Self-Government) प्रशासक नियुक्त केले आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. यासाठी विधी व न्याय विभागाकडून तांत्रिक बाबींची पूर्तता करून राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू मांडणार असून लवकरच निवडणुका घोषित केल्या जातील, अशी माहिती विधी व न्याय विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.
 
 
मुदत संपलेल्या महानगर पालिका
 
मुंबई (2022), ठाणे(2022), नवी मुंबई(2020), कल्याण डोंबिवली(2020), उल्हासनगर(2022),, भिवंडी निजामपूर(2022),, पनवेल(2022),, मीरा-भाईंदर(2022),, वसई विरार(2020), नाशिक(2022),, मालेगाव(2022),, धुळे(2023), जळगाव(2023), अहमदनगर(2023), पुणे(2022),, पिंपरी चिंचवड(2022),, सांगली(2023), कोल्हापूर,(2020), सोलापूर(2022), औरंगाबाद(2020), परभणी(2022),, नांदेड(2022),, लातूर(2022),, अमरावती(2022),, अकोला(2022),नागपूर (2022),चंद्रपूर(2022), इचलकरंजी(नवीन महापालिका), जालना (नवीन महापालिका).
नागपालिका /नगरपंचायती - एकूण 246
मुदत संपली - 2020 ते 2022/23
जिल्हा परिषद - एकूण 26
मुदत संपली : ठाणे - 14/1/2023
उर्वरित - 20/3/2022
पंचायत समित्या - एकूण 289
मुदत संपली - 7/1/2023
स्थानिक पातळीवरील सार्वजनिक स्वरूपाची, विशेषतः जनतेच्या प्राथमिक गरजांशी निगडित असलेली कामे करणाऱ्या संस्थांना 'स्थानिक स्वराज्य संस्था' (Local Self-Government) असे म्हणले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government) म्हणजे शहरे, खेडे आणि ग्रामीण वस्त्यांमधील रहिवासी त्यांच्या स्वतःच्या घरात होस्ट आहेत. लोक स्थानिक परिषदांची निवड करतात आणि त्यांचे प्रमुख त्यांना सर्वात महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकृत करतात. स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government) या शासनसंस्थेचाच एक प्रकार किंवा भाग होय. मर्यादित कार्यक्षेत्र हे त्यांचे एक प्रमुख लक्षण समजले जाते.
 
भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे (Local Self-Government) जनक कोण आहेत ? लॉर्ड रिपन हे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे (Local Self-Government) जनक आहेत. गाव आणि जिल्हा पातळीवर कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी स्थानिक सरकार आवश्यक आहे. स्थानिक सरकार हे गाव आणि जिल्हा स्तरावर कार्यरत असलेले आणि सामान्य लोकांच्या सर्वात जवळचे सरकार आहे. भारतात अनेक प्रकारच्या नागरी स्थानिक संस्था आहेत जसे की महानगरपालिका, नगरपालिका, अधिसूचित क्षेत्र समिती, नगर क्षेत्र समिती, विशेष उद्देश संस्था, टाउनशिप, पोर्ट ट्रस्ट, कॅन्टोन्मेंट बोर्ड इ.