नागपूर - नागपुरात एक अजबगजब प्रकार घडला आहे. गुन्हेगारांनी पोलिसांच सोंग घेऊन गुन्हा केल्याची घटना नागपुरात पुढे आली आहे. तर एका दाम्पत्याकडून दागिने लंपास (Theft of jewellery) केल्याची माहिती आहे. तोतया पोलिसांनी हातचलाखी करून एका दाम्पत्याचे अडीच तोळ्यांचे दागिने लंपास (Theft of jewellery) केले. दागिने लंपास (Theft of jewellery) करण्याची घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत सकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी पीडित विजय महाबुधे (60) रा. हिंगणघाटच्या यांच्याकडून दागिने लंपास (Theft of jewellery)झाल्याच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपी इराणी टोळीतील (Irani Gang) आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजमधून लक्षात आले आहे कि की आरोपी वर्धा मार्गाने पळाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींची चालाकीने पीडित असलेल्या विजय यांच्याकडून त्यांची मदत करीत असल्याचे भासवून दागिने लंपास केले आहेत.
सविस्तर घटना अशी...
विजय महाबुधे हे मोहता मिलमध्ये अधिकारी होते. काही दिवसांपूर्वीच ते तेथून सेवानिवृत्त झाले. त्यांची मुलगी मानेवाडा परिसरात राहते. त्यामुळे ते पत्नी ज्योती महाबुधे (57) यांच्यासह आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी कारने नागपुरात आले होते. सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास ते अजनी ठाण्यांतर्गत असताना त्यांना कोणीतरी आपला पाठलाग करीत असल्याचे जाणवले. तेवढ्यातच पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या भागात 2 दुचाकीस्वार आरोपींनी दुचाकी आडवी लावून त्यांची कार थांबवली. आणि त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली.
पोलिस असल्याची बतावणी करून त्यांना खोटे ओळखपत्रही दाखवले. त्यामुळे, त्यांचा विश्वास बसला. पुढे दागिने लूटपाट करण्याच्या उद्देशातून खून झाला असल्याची माहिती दिली. तसेच तुम्ही एवढे दागिने अंगावर घालून कुठे जात आहात, अंगावरील दागिने काढा आणि खिशात ठेवा, अशी सूचना दिली. घाबरल्यामुळे ज्योती यांनी गळ्यातील सोनसाखळी, नेकलेस आणि अंगठी काढून पतीजवळ दिली. ते खिशात ठेवत असतानाच आरोपीने त्यांच्याजवळून दागिने घेतले आणि असेच ठेवू नका, पुढे धोका आहे, अशी बतावणी करून दागिने एका कागदात बांधून देत असल्याचे भासविले.
या दरम्यान हात चलाखी करीत दागिन्यांऐवजी दगड ठेवून पुडी विजय यांच्याकडे दिली. काही अंतर गेल्यावर विजय यांनी खिशातील पुडी काढून बघितली असता त्यात दगड आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अजनी पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, वर्धा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींची ओळख पटली असून ते ईरानी टोळीचे (Irani Gang) असल्याची माहिती राजकुमार यांनी दिली.