Tirupati Balaji Temple तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तिकीट काउंटरवरची गर्दी जिवावर बेतली, पाच मिनिटे वाटले की, मी वाचणार नाही - पीडित, भाविकांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई

Top Trending News    10-Jan-2025
Total Views |
   

                                  balaji temple 
 
तिरुपती - हजारो वर्ष जुने असलेल्या आंध्रप्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple) दररोज ५० हजार ते लाखो भाविकांची वर्दळ असते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple) झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple) घडलेल्या चेंगराचेंगरीने मंदिर परिसरातील भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर, तसेच तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) संस्थांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
 
दरदिवशी लांबचा पल्ला गाठून हजारो भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी येतात. तिरुपती बालाजी मंदिर संस्थान हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरात गणले जाते. श्री तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple)येणाऱ्या भाविकांकडून केले जाणारे दान हे वर्षाला कोट्यवधींच्या जवळपास असते. तरीसुद्धा श्री तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple) झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने भाविकांमध्ये नाराजी दिसून आली आहे. तसेच तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
तिकीट काउंटरवरची गर्दी जिवावर बेतली
 
आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Balaji Temple)वैकुंठद्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. १० दिवसांच्या विशेष वैकुंठद्वार दर्शनासाठी तिकीटांचे वाटप सुरू होते. श्री तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) समितीने 91 काउंटर उघडले होते. सुमारे चार हजार भाविकांची गर्दी होती. दरम्यान, रांगेत उभी असलेली एक महिला बेशुद्ध पडली. तिला उपचारासाठी गेट उघडून बाहेर काढण्यात आले. यादरम्यान लोक आत शिरू लागले. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली. त्यात आजारी महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मंदिरात (Tirupati Balaji Temple) वैकुंठ एकादशीला वैकुंठद्वार दर्शनासाठी उघडण्यात येणार होते. त्यामुळे टोकन घेण्यासाठी असंख्य लोक रांगेत उभे होते.
 
पाच मिनिटे वाटले की, मी वाचणार नाही - पीडित
 
या घटनेतून बचावलेल्या डी. वेंकट लक्ष्मी यांनी सांगितले की, मला 5 मिनिटे असे वाटले की, मी वाचणार नाही. मी गेल्या 25 वर्षांपासून श्री तिरुपती बालाजी मंदिरात येत आहे आणि असे कधीही झाले नाही. सहा मुलांनी मला बाजूला ओढून प्यायला पाणी दिले. लक्ष्मी यांच्या म्हणण्यानुसार लोकांचा लोंढा पुढे सरकला आणि मी जिथे उभी होती तिथेच पडली. मी बाजूला पडल्याची ओरड करत होती, पण लोक मागून पळत होते. त्यांना आवरता आले नाही. ते पुढेही सरकत नव्हते आणि नियंत्रणाबाहेर गेले होते. लोक भाविकांना तुडवत जात होते. मला बराच वेळ श्वासही घेता आला नाही. पोलिसांनी भाविकांना सुव्यवस्थितपणे पुढे जाऊ दिले असते तर ही घटना टाळता आली असती.
 
भाविकांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई
 
आंध्र प्रदेश सरकारने मंदिरातील (Tirupati Balaji Temple)चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर, राज्याचे महसूल मंत्री ए सत्य प्रसाद म्हणाले, आम्ही इतर कशानेही जीवनाची भरपाई करू शकत नाही.