Tulja Bhawani Temple तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे

Top Trending News    10-Jan-2025
Total Views |
 
                            tulja bhawani 
 
तुळजापूर - महाराष्ट्रातील तुळजापूर येथील तुळजा भवानी माता मंदिर (Tulja Bhawani Temple) अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तुळजापूर भवानी माता मंदिर ( Tulja Bhawani Temple ) पुरातन काळातले असून एक ऐतिहासिक मंदिर आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तुळजापूरचे तुळजा भवानी माता मंदिर (Tulja Bhawani Temple) आहे. शिवाजी महाराज नित्यनियमाने रोज तुळजा भवानी माता मंदिरात ( Tulja Bhawani Temple ) दर्शन घेऊन भवानी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येत होते. म्हणूनही या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
नुकतेच पुरातत्त्व विभागाने तुळजा भवानी मातेच्या मंदिराची ( Tulja Bhawani Temple ) पाहणी केली. या पाहणीत तुळजा भवानी मंदिरातील ( Tulja Bhawani Temple) मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शिळांना तडे गेल्याची बाब पुरातत्व विभागाच्या पाहणीत उघडकीस आली आहे. तुळजा भवानी माता मंदिर ( Tulja Bhawani Temple) गाभाऱ्यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढून टाकल्यानंतर काही शिळा खचलेल्या तर काहींना तडे गेलेले आढळले. यावेळी मंदिर संस्थानचे अधिकारी उपस्थितीत होते.
तुळजा भवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या जतन व संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या निगराणीखाली सुरू आहे. गाभाऱ्यातील तडे गेलेल्या शिळांचे स्ट्रॅक्चरल ऑडिट व रडार मार्फत तपासणी केली जाणार आहे. पाहणीचा अहवाल आल्यानंतर त्या बदलण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुळजा भवानी माता मंदिर (Tulja Bhawani Temple) संस्थान करत असलेल्या कामावर समाधान व्यक्त करत पाहणी केली.
 
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे ( Tulja Bhawani Temple ) जतन व संवर्धनाचे 65 कोटी रुपयांचे काम मंदिर संस्थानच्या स्वनिधीतून सुरू आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या विविध कामांची पाहणी जिल्हाधिकारी व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. तुळजा भवानी माता मंदिर ( Tulja Bhawani Temple) मंडपाचे बरेचसे दगड काढून पुन्हा नव्याने उभे केले जाणार आहेत. तुळजा भवानी माता मंदिराच्या ( Tulja Bhawani Temple ) गाभाऱ्याचे स्ट्रॅक्चरल इंजीनिअरिंग व रडार तंत्रज्ञानाचा वापर करुन दगड आगामी 200 वर्ष मंदिराच्या कळसाचा भार सहन करू शकतील का याचा अहवाल पुरातत्व विभाग 8 दिवसात सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच महाद्वार बाबतही 8 दिवसात पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालय अहवाल देणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.