China Putin conflict चीन-पुतिन संघर्षाचा सागरी अध्याय ! समुद्राच्या मध्यभागी रोखला आठ तेल टँकरचा ताफा

13 Jan 2025 19:13:32
 
                                china p
 
बीजिंग - रशिया (Russia) आणि चीनमधील (China) मैत्री कोणापासूनही लपलेली नाही. परंतु, या मैत्रीला आता तडा गेलेला आहे. आणि चीन-पुतिन संघर्ष (China - Putin conflict) सुरु झाला आहे. जगातील या दोन महासत्तांमधील संबंध 1950 पासून मजबूत आहेत. सुमारे 3 वर्षांपूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हाही चीनने (China) त्यावर टीका केली नव्हती. तर, त्याला साथ दिली होती. परंतु, आता चीन-पुतिन संघर्ष (China - Putin conflict) वेगळ्याच वळणावर जातोय. युक्रेन युद्धात चीन (China) रशियाला (Russia) मोठ्या प्रमाणात शस्त्रे पुरवत असल्याच्या बातम्याही येत राहिल्या. परंतु, चीन-पुतिन संघर्षाचा (China - Putin conflict) आता सागरी अध्याय सुरु झाला आहे. पाश्चात्य निर्बंधांना न जुमानता चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (President Xi Jinping) यांनी स्वतः मॉस्कोला भेट दिली होती. परंतु, आता अशी बातमी आली आहे. ज्यामुळे रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच चीन-पुतिन संघर्षाचा (China - Putin conflict) सुरुवात झाली आहे.
 
हेही वाचा - Makar Sankranti Horoscope कशी असेल मकर संक्रांत, काय सांगते तुमच्या राशीचे भाग्य 
 
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे चीनच्या (China) सर्वात मोठ्या बंदरातील अधिकाऱ्यांनी मोठ्या रशियन तेल टँकर वाहून नेणाऱ्या आठ जहाजांच्या ताफ्याला त्यांच्या बंदरात येण्यापासून रोखले आहे. पूर्व चीनच्या (China) शेडोंग पोर्ट ग्रुपने रशियन तेल टँकरच्या ताफ्यावर ही बंदी घातली आहे. या प्रदेशात असलेल्या अनेक तेल शुद्धीकरण कारखाने परदेशी तेलाचे प्रमुख आयातदार राहिले आहेत.
 
चीन (China) हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा (Raw Oil) आयातदार देश आहे आणि फेब्रुवारी 2022 पासून तो रशियन कच्च्या तेलाचा (Raw Oil) सर्वात मोठा आयातदार आहे. कारण, पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. असे असूनही, चिनी बंदराने रशियन जहाजांना तेथे सामान उतरवण्यापासून किंवा डॉकिंग करण्यापासून रोखले आहे. ही बंदी केवळ शेडोंग बंदरावरच लागू नाही, तर शेडोंग पोर्ट ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या रिझाओ, यंताई आणि किंगदाओ या जवळच्या बंदरांनाही लागू आहे. बंदी घातलेल्या 8 तेल टँकरपैकी प्रत्येकाची क्षमता 20 लाख बॅरल आहे. याचा अर्थ असा की चीनने समुद्राच्या मध्यभागी एकूण 16 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची शिपमेंट सोडून दिली आहे.
Powered By Sangraha 9.0