नागपूर - प्रेयसीला आयफोन देण्यासाठी चोरीचा (Theft for iPhone) मार्ग दोन भावंडांनी पत्करला आहे. एका घराचे कुलूप तोडून रोख 1.44 लाखांवर डल्ला मारला आणि त्यांनी आयफोन साठी (Theft for iPhone) ही चोरी केली आहे. पळून जात असताना गस्तीवर निघालेल्या कळमना पोलिसांच्या ते हाती लागले. पोलिसांनी त्यांच्याकडून आयफोन साठी चोरलेली (Theft for iPhone) चोरीची रक्कम जप्त केली. चैनीच्या वस्तू म्हणजेच आयफोन साठी चोरी (Theft for iPhone) केल्याने या प्रकारची सर्वत्र चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी सख्खे भाऊ आहेत. एकचे वय 17 तर दुसऱ्याचे वय 16 वर्ष आहे. जुनी कामठी (Kamathi) मार्गावरील कामनानगर परिसरात राहणारे दिघेश्वर किसनलाल रहांगडाले (36) हे गत 6 जानेवारी रोजी घराला कुलूप लावून गावी गेले होते. बुधवारी आरोपींना त्यांच्या घरी कुलूप दिसले. सुरक्षा भिंत ओलांडून ते आवारात शिरले. मुख्य दाराचे कुलूप तोडून आत घुसत कपाटातील 1 लाख 44 हजारांची रोकड चोरी करून पसार झाले. गुरूवारी पहाटे कळमना पोलिसांचे पथक ठाण्यांतर्गत गस्त घालत होते.
या दरम्यान दोघेही भाऊ संशयास्पदरित्या फिरताना दिसले. त्यांना थांबण्यासाठी आवाज दिला असता दोघांनीही पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही पकडले. झडतीमध्ये त्यांच्याजवळ 1.43 लाख रुपये मिळाले. काही पैसे त्यांनी खाण्या-पिण्यात उडवले होते. पोलिसांनी पैशांबाबत विचारले असता कामनानगरात घरफोडी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी रहांगडाले यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
चोरीचे 8 गुन्हे आहेत दाखल
सखोल चौकशीत माहिती मिळाली की, मोठ्या भावाचे परिसरातच राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत. तर प्रेयसीला आयफोन देण्यासाठी चोरी (Theft for iPhone) त्यांनी केली. त्यामुळे दोघांनीही चोरीची योजना बनवली. दोघांविरुद्ध यापूर्वीही चोरीचे 8 गुन्हे नोंद आहेत. मात्र, दरवेळी त्यांना अल्पवयीन असल्याचा लाभ मिळतो. बाल निरीक्षणगृहातूनही ते लवकरच बाहेर येतात. दोघाही भावांना दारू आणि गांजाचे व्यसनही आहेत. चोरीचे पैसे ते मौजमज्जा करण्यात उडवतात.