मुंबई - विनोद कांबळीची (vinod kambali) वाईट अवस्था काही दिवसांपूर्वी सर्वांनीच पाहिली होती. पण विनोद कांबळीचे (vinod kambali) दिवस आता बदलले आहेत. विनोदचे हे वाईट दिवस आता संपले आहेत. कारण विनोद कांबळी (vinod kambali) आता फिट होत असल्याचे समोर येत आहे. विनोद कांबळीला (vinod kambali) सुरुवातीला उभेही राहता येत नव्हते, पण तोच विनोद आता नाचायलाही लागल्याचे पाहायला मिळत आहे. विनोद कांबळीचा एक व्हिडीओ भन्नाट व्हायरल झाला आहे.
विनोद कांबळी (vinod kambali) जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होता, तेव्हा त्याला चालताही येत नव्हते. विनोद कांबळीला (vinod kambali) त्यावेळी चक्कर येत होती आणि त्याचे पाय लटपटत होते. त्यामुळे त्याने आपल्या कुटुंबियांना थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्यानंतर शैलेश ठाकूर यांनी विनोद कांबळीला (vinod kambali) हॉस्पिटमलमध्ये आणण्याची व्यवस्था केली. विनोदवर त्यानंतर चांगले उपचार करण्यात आले आहेत आणि याचे फलित म्हणजे विनोद आता चांगलाच फिट होत चालला आहे. ज्या विनोदला चालताही येत नव्हतो, तो विनोद आता चक्क नाचायला लागला आहे.