मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील (Saif Ali Khan) हल्ला प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा पोलिस कोठडीत आहे. तपासादरम्यान त्याने अनेक नवीन खुलासे केले. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, हल्लेखोर बांगलादेशातील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होता. कदाचित यामुळेच सैफ अली खानची (Saif Ali Khan), चांगली शरीरयष्टी असूनही, त्याला मात देऊ शकला नाही. शहजादने पोलिसांना सांगितले की, तो कमी वजनाच्या गटात राष्ट्रीय पातळीवर कुस्तीगीर आहे. यामुळेच, त्याला सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) फ्लॅटवरून निसटून जाण्यास फारशी अडचण आली नाही. आता पोलिस शहजादच्या जबाबांची पडताळणी करतील.
सैफची इमारतच का निवडली ?
पोलिस सूत्रांनुसार, शहजादला बांगलादेशात काम नव्हते म्हणून तो कामाच्या शोधात मुंबईत आला होता. येथून परतण्यासाठी 50 हजार रुपयांची आवश्यकता होती. यामुळे तो सैफ अली खानाच्या (Saif Ali Khan) घरी चोरी करण्यासाठी गेला. शहजादने म्हटले आहे की, त्याला सैफची इमारत फारशी उंच वाटली नाही. तो तेथे गेला होता आणि तेथील सुरक्षा कोणत्या वेळी सैल असते, हे देखील माहीत होते.