Black Magic । पत्नी माहेराहून परत येईना म्हणून पतीने केली काळी जादू ! सीसीटीव्हीत कैद झाला संपूर्ण प्रकार

22 Jan 2025 23:15:35

                                 black 
 
धारावी : अँटॉप हिल परिसरात एका विधवेने चक्क काळ्या जादूच्या (Black Magic) विरोधात तक्रार नोंदविली आहे. अँटॉप हिल पोलिस (Antop Hill Police) ठाण्यात 23 वर्षीय गोपाळ नावाच्या तरुणाविरोधात काळी जादू (Black Magic) करणे, छळ करणे आणि तिच्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण करणे, अशी लेखी तक्रार सीसीटीव्हीमध्ये कैद पुराव्यानिशी दाखल केली आहे. या अजब काळ्या जादूच्या (Black Magic) तक्रारीमुळे एकच खळबळ माजली असून अँटॉप हिल पोलिसांनी (Antop Hill Police) चौकशी करून कारवाईचे आश्वासन पीडित महिलेला दिले आहे. ही तक्रार एका विधवेने नोंदविली आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या 18 वर्षीय मुलीचे गेल्या वर्षी तिच्या नियोजित लग्नाच्या पाच दिवस आधी, सायन-कोळीवाडा आंबेडकर नगर येथील रहिवासी गोपाळ वय 23 याने अपहरण केले होते. दोघांनीही वांद्रे कोर्टात लग्न केले. लग्नानंतर, गोपाळ आणि त्याच्या कुटुंबाकडून मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जाऊ लागला.
 
पीडित महिलेच्या मुलीने आईला सांगितले की, गोपाळ आणि त्याची आई रात्रीच्या वेळी मानवी कवटीचा वापर करून माझ्यावर काळी जादू (Black Magic) करायचे. ज्यामुळे मला खूप त्रास होऊ लागला. माझ्या मुलीने काळ्या जादूचा (Black Magic) विरोध केला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तीन महिन्यांनंतर माझ्या मुलीला तिचा जीव धोक्यात आहे, असे वाटल्याने ती पळून माझ्याकडे आली.
 
 हेही वाचा - Saif Ali Khan सैफचा हल्लेखोर राष्ट्रीय कुस्तीपटू, चौकशीत उघड झाले धक्कादायक सत्य !
 
गेल्या आठवड्यात तक्रारदार विधवा महिलेच्या घराबाहेर एक संशयास्पद पार्सल आढळून आले. पार्सल उघडल्यावर त्यात लिंबाचा तुकडा, एक सुई, हळद, कुंकू आणि काळी पावडर आढळली. घराबाहेरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये असे दिसून आले की, गोपाळने पहाटे 1:20 वाजता दाराजवळ पार्सल ठेवले होते. गोपाळने परिसरातील लोकांना सांगितले आहे की त्याची पत्नी 45 दिवसांत मुंबईला परत येईल आणि काळ्या जादूमुळे रक्ताच्या उलट्या होऊन मरेल. यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने अँटॉप हिल पोलिस स्टेशनच्या (Antop Hill Police) वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी तक्रार दिली आहे. ही मुलगी सध्या तामिळनाडूमध्ये सुरक्षित आहे आणि ती शिवणकाम आणि सौंदर्यप्रसाधनांचे प्रशिक्षण घेत आहे.
Powered By Sangraha 9.0