जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यात बुधवारी भीषण रेल्वे अपघात झाला आहे. आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेस मधून (Pushpak Express) खाली रुळावर उड्या मारल्या. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने (Pushpak Express) अचानक ब्रेक लावला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये (Pushpak Express) आग लागल्याच्या अफवांमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. पुष्पक एक्सप्रेसने (Pushpak Express) अचानक ब्रेक लावला. नेमक्या त्याचवेळी समोरून कर्नाटक एक्स्प्रेस (Karnataka Express) भरधाव आली. यामुळे अचानक आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. या एक्स्प्रेस खाली 50 प्रवासी चिरडल्या गेले. यातील 6 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 30 ते 40 प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जळगाव-मुंबई रेल्वेमार्गावर माहिती व परधोड रेल्वेस्थानकादरम्यान बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. मृतांचा नेमका आकडा अद्याप समोर आला नसला, तरी मोठ्या प्रमाणावर जिवित हानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पुष्पक एक्सप्रेसमध्ये (Pushpak Express) आग लागल्याच्या अफवांमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि काहींनी जीव वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. दुर्दैवाने, ते शेजारील ट्रॅकवर उतरताच, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली (Karnataka Express) ते चिरडले गेले. अचानक ब्रेक दाबल्याने ठिणग्या दिसल्यामुळे अचानक खळबळ उडाली.
मुंबईपासून 400 किमी अंतरावर अपघात
घटनेचे ठिकाण मुंबईपासून 400 किमी अंतरावर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी तीव्र वळण होते. यामुळे दुसऱ्या ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांना ट्रेन आल्याचे कळले नाही. याच कारणामुळे इतक्या मोठ्या संख्येने लोक वेगाने येणाऱ्या कर्नाटक संपर्क क्रांतीने चिरडले.