Generation Beta | नवीन वर्षात जन्माला येणारी मुले असणार जनरेशन बीटा

04 Jan 2025 17:30:05

                                    Generation beta
 
दिल्ली - जनरेशन झेड किंवा जेन्झी आणि जनरेशन अल्फाचा अर्थ लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यातच आता जनरेशन बिटा (Generation Beta) सुरू झाली आहे. नविवर्षापासून जन्माला येणाऱ्या या नव्या पिढीचे नाव आहे ‘जनरेशन बीटा’(Generation Beta). 1 जानेवारी 2025 पासून जन्मलेल्या मुलांना ‘जनरेशन बीटा’ असे नाव देण्यात आले आहे.
 
साधारणपणे कोणत्याही पिढीचे नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवले जाते. एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट त्या काळातील काही महत्त्वाच्या घटनेच्या आधारे (युद्ध, आर्थिक वाढ किंवा कोणताही मोठा तांत्रिक बदल) ठरवला जातो. या पिढ्या सहसा 15-20 वर्षांच्या कालावधीसाठी ठरवल्या जातात. नववर्षात जन्मलेल्या बाळांना आता ‘जनरेशन बीटा’(Generation Beta) या नावाने ओळखले जाईल.
 
हेही वाचा -  Secretary P. K. Mishra पंतप्रधानांच्या सचिवांची ओळख दाखवून, ओडिशातील फसवणूक करणारे जोडपे गजाआड ! 
 
जनरेशन झेड : 1997-2009
 
1997 ते 2009 या काळात जन्माला आलेल्या पिढीला जन्मत:च इंटरनेट आणि सोशल मीडियासारखे प्लॅटफॉर्म मिळाले. डिजिटल युगात वाढणारी ही पिढी स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. डिजिटल युगात सोशल मीडियावरून पैसे कसे कमवायचे हे या पिढीला चांगलंच माहीत आहे. आता ही नवी ‘जनरेशन बीटा’(Generation Beta) काय काय कमाल करून दाखवेल. हे बघणे अतिशय रोचक ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0