Los Angeles अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये आगीचा कहर ! शेकडो घरे भस्‍मसात

09 Jan 2025 13:19:42

                                      fire
 
लॉस एंजेलिस - अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या (California) जंगलात लागलेल्‍या भीषण आगीने (Fire) लॉस एंजेलिस (Los Angeles) शहरानजीकच्‍या दाट लोकवस्तीला वेढले. आगीच्या ज्वाळांनी शेकडो घरांना आपल्‍या कवेत घतले आहे. लॉस एंजेलिसच्या (Los Angeles) पॅसिफिक पॅलिसेड् भागात काही मिनिटांतच अनेक घरे जळून राख झाली आणि त्यांच्यासमोर उभी असलेली शेकडो वाहने काही क्षणातच जळून खाक झाली. लॉस एंजेलिसच्या (Los Angeles) रहिवासी भागात आणि आजूबाजूच्या परिसरात लागलेल्या भीषण आगीपासून वाचण्यासाठी हजारो लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे, असे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे.
 
हेही वाचा - IIT Indur खाऱ्या पाण्यालाही येणार गोडवा, सौरऊर्जेने केली क्रांती. जाणून घ्या काय आहे संशोधन 
 
शहरात हाहाकार ! हजारो लोक रस्‍त्‍यावर
 
कॅलिफोर्नियामध्ये (California) सध्या तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी पॅसिफिक पॅलिसेड्च्या आगीने अतिशय धोकादायक रूप धारण केले आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, रस्त्यांवरील आगीमुळे लोकांना समुद्रकिनारी आश्रय घ्यावा लागला आहे. आगीच्‍या दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आगीचे दृश्य पाहून लोक घाबरले. तत्‍काळ त्‍यांनी घर सोडून पळून गेले. अचानक सर्वत्र आगीचे लोट उसळले. हजारो नागरिक एकाचचेळी रस्‍त्‍यवर उतरल्‍याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मोठ्या संख्येने लोक घरे सोडून पलायन केले. सर्वत्र एकच घबराट उडाली. शेकडो घरांसह वाहनेही आगीत भस्‍मसात झाली आहेत.
Powered By Sangraha 9.0