मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) चाहते त्याला बघण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत नजर खिळवुन बसत होते. मात्र आता सलमान खानची (Salman Khan) झलक पाहणे आता कठीण होणार आहे. सलमान खानला (Salman Khan) येणाऱ्या धमक्यामुळे त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. सलमान खान (Salman Khan) राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट फ्लॅटच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावली असल्याचे सलमान खान (Salman Khan)फ्लॅटच्या छायाचित्रांवरून दिसते. याचा अर्थ असा की एखाद्याने सलमान खान (Salman Khan)फ्लॅटला लक्ष्य करून गोळी झाडली तरी त्याच्या घराच्या भिंतींनाही इजा होणार नाही. सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या कुटुंबीयांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या आल्या होत्या. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सलमान खानच्या (Salman Khan)घराच्या सुरक्षेतील या वाढीमुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे, जे बाल्कनीतूनच सलमानची झलक बघायचे त्यांना आता ही संधी मिळणार नाही. नसल्याची खंत सलमान खानच्या (Salman Khan)चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल
वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खानच्या (Salman Khan) फ्लॅटची बाल्कनी बुलेटप्रूफ काचेने झाकण्यात आल्याचे दिसत आहे. येथूनच सलमान (Salman Khan) त्याच्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असे. आता ही बाल्कनी पूर्णपणे झाकली गेली आहे. त्यामुळे चाहते सलमानला पाहू शकणार नाहीत. अनेकदा सलमान खान (Salman Khan) बाल्कनीत उभा राहून चाहत्यांना भेट द्यायचा. शेकडो चाहते सलमान खान (Salman Khan) राहत असलेल्या अपार्टमेंटच्या बाहेर उभे राहतात. जेणेकरून त्यांना सलमान खानची (Salman Khan) एक झलक पाहता येईल. मात्र चाहत्यांची आता निराशा झाली आहे.