Chandrakant Patil | शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर भाजपाचा विजय - चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी !

Top Trending News    17-Feb-2025
Total Views |

bjp 
 
कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) हा आधी शेतकरी कामगार पक्षानंतर काँग्रेस (Congress) आणि त्यानंतर शरद पवारांचा (Sharad Pawar) बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, आता भाजपने (BJP) या बालेकिल्ल्यांची धुळदान उडवली आहे. त्यांच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. लोकसभेला काहीशी पीछेहाट झाली होती. मात्र, त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत आपण काढल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. ते कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
 
पक्षांतरासाठी अनेकांची धावपळ सुरु
 
कधी कधी आपलीच ताकद आपल्याला माहीत नसते, ताकदीची जाणीव करुन देण्यासाठीच ही कार्यशाळा आहे, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्याकडून कोण लढू शकते ? याचा याचा विचार करुन त्यांना ताकत द्या, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. सध्या पक्षांतरासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे.
 
नुकतेच धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी स्टेजवरच चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे जिल्ह्यातील काही जणांची यादी दिली आहे, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. लवकरच त्यांचा प्रवेश करून घेऊ असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. तसं झाल तर जिल्ह्यात विरोधकच बाकी राहणार नाही, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. काही जण आता काळ्या जादूबद्दल बोलत आहेत. मात्र, आपले आता 227 आमदार आहेत. काळी जादू करुन सुद्धा काही फरक पडणार नाही असेही पाटील (Chandrakant Patil) यावेळी म्हणाले.