नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने प्रसिद्ध (YouTuber) आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाबदिया (Ranveer Allahbadia) यांना त्यांच्या विरोधात भारतातील विविध राज्यांमध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या (FIR) संदर्भात अटक टाळण्यासाठी अंतरिम संरक्षण दिले आहे.
रणवीर अल्लाबदिया (Ranveer Allahbadia), जो ‘बीयर बायसेप्स’ (Beer Biceps) या नावाने ओळखला जातो, यांच्यावर विविध गुन्ह्यांशी संबंधित एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत. रणवीर अल्लाबदिया (Ranveer Allahbadia) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना तात्पुरते संरक्षण देत संबंधित राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे.
कोर्टाच्या या निर्णयामुळे रणवीर अल्लाबदियांना (Ranveer Allahbadia) तात्पुरता दिलासा मिळाला, असला तरी पुढील सुनावणीपर्यंत त्यांचे कायदेशीर संकट पूर्णपणे टळलेले नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.