लाहोर : लाहोर (Lahore) मधील गद्दाफी स्टेडियम (Gaddafi Stadium) मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांनी एका मोठ्या गोंधळाचा साक्षीदार झाला कारण, दोन्ही संघ त्यांच्या राष्ट्रीय गीतांसाठी उभे असताना भारतीय राष्ट्रगीत काही सेकंदांसाठी वाजवण्यात आले. गद्दाफी स्टेडियममध्ये (Gaddafi Stadium) झालेल्या या अनपेक्षित गोंधळात "भारत भाग्य विधाता" हा भाग अंदाजे दोन सेकंदांसाठी वाजला. यानंतर, आयोजकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी राष्ट्रगीत थांबवले.
या घटनेमुळे सामाजिक माध्यमांवर प्रचंड मीम्स (Memes) आणि प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या गोंधळाचा आनंद घेतला, तर काहींनी आयोजकांवर टीका केली. विशेषतः हा प्रकार आश्चर्याचा धक्का देणारा होता. कारण भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये रविवारी होणार आहे. भारताच्या सर्व चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) सामने दुबईत हायब्रिड मॉडेल अंतर्गत होत आहेत. त्यामुळे भारत संघ पाकिस्तानमध्ये नाही.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ मोठ्या दडपणाखाली होते. कारण इंग्लंडला भारताविरुद्धच्या ३-० वनडे मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियालाही श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अपयश आले होते. विशेषतः त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाज तिकडी (पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड) यांच्या अनुपस्थितीमुळे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या युवा खेळाडूंनी जबाबदारी उचलण्याची गरज होती.
भारत-पाकिस्तानचा महामुकाबला
भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचा वरचष्मा आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) ३-२ असा आघाडीचा विक्रम आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत रोमहर्षक ठरणार आहे. भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला (India) विजेतेपद कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे, तर भारतासाठी हा सामना उपांत्य फेरी जवळ जाण्याची संधी आहे. तसेच, हा सामना २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतासाठी असेल. त्या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला होता.