Curfew In Nashik नाशिकच्या कथे गल्लीत तणाव ! बेकायदेशीर धार्मिक बांधकामावरून संचारबंदी लागू

23 Feb 2025 16:43:05

nashik 
 
नाशिक : नाशिकमध्ये संचारबंदी (Curfew In Nashik) लागू करण्यात आली आहे. द्वारका परिसरातील कथे गल्लीत एका बेकायदेशीर धार्मिक बांधकामावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाने नाशिकमध्ये संचारबंदी (Curfew In Nashik) लागू केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस दल, विशेष सुरक्षा पथके आणि बॅरिकेड्स तैनात करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये संचारबंदीचे (Curfew In Nashik) कारण म्हणजे धार्मिक स्थळाचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यावरून स्थानिकांमध्ये मतभेद झाले. या वादामुळे परिसरात तणाव निर्माण झाला, ज्यामुळे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तत्काळ नाशिकात संचारबंदीचा (Curfew In Nashik) आदेश जारी केला.
 
 
पोलीस प्रशासनाची कारवाई
नाशिक पोलिसांनी सुरक्षेसाठी कडेकोट उपाययोजना केल्या असून, कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संपूर्ण भागात कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने सध्या कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही. मात्र, सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0