India defeated Pakistan पाकिस्तानचा धुव्वा ! भारताचा दणदणीत विजय - देशभर उत्साहाची लाट

24 Feb 2025 10:23:36


king 
 
दुबई - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy) महामुकाबल्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानची टीमला भारताने पाकला लोळवले (India defeated Pakistan). भारतीय टीमने अपेक्षेप्रमाणे पाकला लोळवले (India defeated Pakistan) त्यामुळे देशभर उत्साहाची लाट निर्माण झाली. भारतीय टीमने पाकिस्तानला 49.4 षटकांत 241 धावांवर रोखले. शतक ठोकत किंग कोहलीने पाकिस्तानला भारतासमोर लोळण्यास (India defeated Pakistan) भाग पडले. पाकिस्तानच्या लक्ष्यवर प्रत्युत्तर म्हणून भारताने 21 षटकांत 2 विकेट गमावून 125 धावा केल्या. ओपनर बॅट्समन कर्णधार रोहित शर्मा 20 धावा करून बोल्ड झाले. त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनी टीमचा स्कोर बोर्ड वर दमदार आकडा जोडला. त्यानंतर शुभमन 44 धावांवर बोल्ड झाला. त्याच्या जागी श्रेयस अय्यर क्रीझवर आला आणि कोहलीसोबत धावांची पुढची खेळी सांभाळली.
 
त्याआधी पाकिस्तानसाठी सउद शकीलने सर्वाधिक 76 बॉलमध्ये 5 चौकारांसह 62 धावांची खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिजवानने 77 बॉलमध्ये 46 धावा केल्या. खुशदिल शाहने 39 बॉलमध्ये 38 धावांची तुफान खेळी केली. भारतासाठी हैट्रिकची कमाई करत कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या, तर हार्दिक पंड्याला 2 विकेट मिळाल्या. अक्षर पटेल, हर्षित राणा आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

शमीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 5 व्हाइट बॉल
 
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानला अपेक्षेपेक्षा चांगली सुरुवात मिळाली. मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये 5 व्हाइट बॉल फेकल्या, ज्यामुळे ओपनिंग करणारे इमाम उल हक आणि बाबर आजम यांचा आत्मविश्वास थोडा वाढला. पण, ओपनिंग भागीदारी मोठी होण्याच्या आधीच हार्दिक पंड्याने बाबर आजमची कॅच केएल राहुलच्या हातात देऊन त्याला 23 धावांवर आउट केला.
 
त्याच्यानंतर इमाम उल हक हा रन आउट झाला. अक्षर पटेल तेथे जबरदस्त काम करीत इमाम उल हकला रन आउट केले. तो 10 धावांवर परतला, तर सउद शकील आणि मोहम्मद रिजवान यांच्यात 104 धावांची भागीदारी झाली. यावेळी हर्षित राणाने मोहम्मद रिजवानची कॅच सोडली आणि कुलदीप यादवने सउद शकीलचा कॅच सोडली. नंतर लगेच अक्षरने रिजवानला बोल्ड केले आणि शकीलला हार्दिकने आउट केलं, ज्यामुळे भारतने पुनरागमन झाले.
 
कुलदीपची हॅट्रिक
 
नंतर रविंद्र जडेजाने तैयब ताहिरला 4 धावांवर आउट केलं, तर कुलदीप यादवने एका ओव्हरमध्ये सलमान आगा आणि शाहीन अफरीदी यांना अनुक्रमे 19 आणि शून्य धावांवर आउट करत हैट्रिक मिळविली. मात्र, नसीम शाहने पुढच्या बॉलवर कुठे तरी बचाव करत स्वतःला आउट होण्यापासून वाचवले.
Powered By Sangraha 9.0