नागपूर : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज (Narendracharya Maharaj) यांच्याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून नरेंद्राचार्य महाराजांच्या (Narendracharya Maharaj) शिष्य परिवारात आणि अनुयायांनी एकत्रित येत विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील संविधान चौकात हे आंदोलन पार पडले.
लोकसभेत महायुतीला मोठे अपयश मिळाले तेव्हा राजकीय चित्र बदलल्याची चर्चा होती. मात्र नंतर पाचच महिन्यात महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 जागांपैकी 132 जागा जिंकल्या. हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नव्हे तर साधू-संत, संघाचा असल्याचे विधान नरेंद्राचार्य महाराज (Narendracharya Maharaj) यांनी केले. तर, 'नरेंद्राचार्य महाराज (Narendracharya Maharaj) यांना कोणते स्वप्न पडले ठाऊक नाही. 'साधू-संतांमुळे महायुती विजयी झाली असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान ठरेल' असे वादग्रस्त विधान विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केले. या प्रतिक्रीयेनंतर विविध स्तरांतून विजय वडेट्टीवारांविरोधात (Vijay Vadettiwar) तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज (Narendracharya Maharaj) हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी संतप्त अनुयायांनी केली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला. संतांच्या बाबतीत अशी वक्तव्ये करणे अयोग्य असून लाखो भक्तांच्या भावना त्यामुळे दुखावल्या जातात, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.