नागपूर - रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमधील भीतीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे तातडीने उपाययोजना केल्या जातील (Bawankule On Tiger Reserve Security). यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule On Tiger Reserve Security) यांनी दिली. एआय, आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा, दहशतीत असलेल्या गावांना कुंपणासाठी लवकरच योग्य पावले लवकरच उचलली जातील, असे नमूद करीत त्यांनी ग्रामस्थांना धीर दिला (Bawankule On Tiger Reserve Security).
पारशिवणी तालुक्यातील नवेगाव खैरी येथे वाघाच्या हल्ल्यामुळे भीतीच्या सावटाखाली असलेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस राज्याचे वन मंत्री गणेश नाईक ऑनलाईन सहभागी झाले होते. राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, वन विभागाच्या प्रधान वनसंरक्षक शोमिता विश्वास, वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास राव, प्रवीण चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. वाघांच्या हल्ल्यावर मात करण्याच्या दृष्टीने गावांना सुरक्षा कुंपण, मोकळ्या जागेत सौर ऊर्जाचे लघु प्रकल्प, सौर ऊर्जावर चालणारे मोठे लाईट्स, बांबू लागवड व एआयच्या माध्यमातून जे करता येणे शक्य आहे ते करू, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
वाघांचे पुनर्वसन, अन्य राज्यात हलवणार ! वनमंत्री नाईक
जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प व वाघांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात वाघांची संख्या ही वाढली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन यातील काही वाघ अन्य राज्यात स्थलांतरित करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ज्या कुटुंबांवर वाघाच्या हल्ल्यातून दुर्दैवी घाला पडला आहे, ज्या कुटुंबाने वाघाच्या हल्ल्यात आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांना तातडीने मदत कशी देता येईल याचा आम्ही विचार करीत आहोत. शेतकऱ्यांना भरपाई पोटी शक्य तेवढी मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मकता ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.