Chamoli Avalanche Rescue Operation आव्हानात्मक हवामानात चमोली हिमस्खलन बचाव मोहीम सुरू ! मुख्यमंत्री धामी

Top Trending News    28-Feb-2025
Total Views |

rescue 
 उत्तराखंडच्या चमोली येथे हिमस्खलन (Chamoli Avalanche Rescue Operation) घटना घडली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, "बीआरओ (सीमा सडक संघटना) च्या रस्ता बांधकाम स्थळाजवळ हे हिमस्खलन झाले आहे (Chamoli Avalanche Rescue Operation) . येथील बचाव कार्य वेगाने सुरू झाले असून आयटीबीपी (Indo-Tibetan Border Police), लष्कर, स्थानिक प्रशासन आणि हवाई दल या सर्व यंत्रणा तत्परतेने मदत करणार आहे (Chamoli Avalanche Rescue Operation)."
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहिती नुसार हवामान अत्यंत खराब असून येथील दृश्यमानता कमी असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. तरी सुद्धा बचाव पथक शर्थीचे प्रयत्न करत असून या घटनेत अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा आहे (Chamoli Avalanche Rescue Operation) . प्रशासन सतत संपर्कात असून राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून गरजेनुसार तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत.
 
 
हिमाचल प्रदेशात अनेकवेळा हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यातील काही प्रमुख घटना खालीलप्रमाणे :
 
किन्नौर हिमस्खलन (२०२१) : किन्नौर जिल्ह्यातील कटगावात झालेल्या हिमस्खलनात अनेक लोक अडकले होते. यात काही जणांना आपला जीव गमवावा लागला.
 
लाहौल स्पीती हिमस्खलन (२०२१) : येथे झालेल्या भीषण हिमवृष्टीमुळे एका घरावर हिमनगाचा तुकडा कोसळला होता.