अमरावती - चिखलदरा हद्दीतील लहान बाळाच्या पोटावर औषधोपचार म्हणून पोटावर चटके देण्यात आल्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेत (Cruelty Of Mother In Amravati), त्या बाळाला पुढील उपचारासाठी ग्रीन कॉरिडोरच्या (Green Corridor) माध्यमातून नागपूर रवाना केले आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनेची सविस्तर चौकशी करण्याबाबत आदेशित केले होते (Cruelty Of Mother In Amravati) . पालकमंत्री यांचा पुढाकार व निर्देशान्वये ही कारवाई करण्यात आली.
अमरावती ग्रामीण पोलिसांनी सदर घटनेतील (Cruelty Of Mother In Amravati) बाळाचे वडील राजू लालमन धिकार (30, रा. सिमोरी, ता. चिखलदरा, जि.अमरावती) यांना भेटून विचारपुस केली असता त्यांनी आपले बयाणात सांगितले की, पत्नीला 3 फेब्रुवारी रोजी अचलपूर शासकीय रुग्णालयात (Cruelty Of Mother In Amravati) मुलगा जन्माला आला आहे. तसेच प्रसूतीनंतर घरी गेल्यावर त्यांचे वडील लालमन धिकार यांचा 13 फेब्रुवारी रोजी आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी वडिलांच्या दशक्रिया कार्यक्रमानंतर सायंकाळी त्यांच्या पत्नीने नवजात मूल सतत रडत असल्याने उपचार म्हणून दोराच्या सहाय्याने पोटावर अनेक चटके दिले (Cruelty Of Mother In Amravati). ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मुलास रुग्णवाहिकेच्या सहाय्याने अचलपूर जिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले होते. त्यानंतर अचलपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने मुलास जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
आईविरुद्धच गुन्हा दाखल (Cruelty Of Mother In Amravati)
घटनेत मुलाच्या आईविरुध्द मुलाचे वडील राजू लालमन धिकार यांनी तक्रार दिली. त्यानुसार चिखलदरा पोलिस (Chikhaldara Police) ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमरावती येथे उपचारादरम्यान बाळाला हृदयाचा गंभीर इजा झाल्याने जीवितास धोका असल्याचे समजले.
ग्रीन कॉरिडोरने पाठविले नागपूरला
मुलाला अमरावती येथून नागपूर येथे विनाविलंब दाखल करण्याकरिता पोलिसांना निर्देश दिले होते. त्यानुसार 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजतादरम्यान अमरावती शहर व ग्रामीण पोलिसांनी त्वरित संयुक्तरित्या नियोजन केले (Cruelty Of Mother In Amravati). मुलाला नागपूर येथे दाखल करण्याकरिता अतिरिक्त पोलिस मनुष्यबळ वापरून ग्रीन कॉरिडोर निर्माण केले आणि विशेष रूग्णवाहिकेत वैद्यकीय तज्त्रांच्या निगराणीखाली विनाविलंब नागपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.